मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
चलग गडे वाडिकडे दत्त -दर्...

मानसगीत सरोवर - चलग गडे वाडिकडे दत्त -दर्...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


चलग गडे वाडिकडे दत्त-दर्शना ॥

जनन-मरणा हरण करुन पुरवि कामना ॥पुर०॥धृ०॥

कृष्णातिरि औदुंबर छायि बैसला ॥

दत्तराज भक्तकाज करित राहिला ॥

शमि तुळसी बेल फुले वाहु त्याजला ॥

धूप दीप नैवेद्या करु प्रदक्षिणा ॥चल०॥१॥

काषायांवर नेसुन भस्म चर्चितो ॥

मृग आसन व्याघ्रांबर पांघरीत तो ॥

रुद्रनेत्रहार कंठि बहु झळाळतो ॥

पायि पादुका करीत भ्रमण त्रिभुवना ॥भ्र०॥चल०॥२॥

धरुन दंड निशिदिनि निज भक्त पाळितो ॥

जटि गंगा वाहतसे चंद्र भाळि तो ॥

भूतपिशाचास गती देइ शीघ्र तो ॥

थोर थोर घोर रोग करि निवारणा ॥करि०॥चल०॥३॥

चौर्‍याशी लक्ष योनि चुकवु साजणी ॥

षट्‍विकार पंचविषय त्रिगुण त्यागुनी ॥

भवसागर तरुन पार होउ या क्षणी ॥

म्हणे कृष्णा मागु मोक्ष अत्रिनंदना ॥अत्रि०॥॥चल०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 29, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP