मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
एक्यायंशीवी केली , भावे म...

मानसगीत सरोवर - एक्यायंशीवी केली , भावे म...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


एक्यायंशीवी केली, भावे मी मित्रासी ॥ ज्याने या नेत्रांसी ज्ञान द्ले ॥८१॥

ब्यांशीवी करुनी, वंदुनी रविसी ॥ वर्णिता गुणांसी वर्णवेना ॥८२॥

त्र्यांशीवी करुनी, नमस्कार सूर्या ॥ अवस्थाही तुर्या, ओलांडण्या ॥८३॥

चौर्‍यांशीवी करुनी, प्रदक्षिणा भानू ॥ टेकूनिया जानू, अर्पी अर्घ्य ॥८४॥

पंचायशीवी करुनी, नमिते खगासी ॥ अज्ञानी दीनासी ॥ उद्धरावे ॥८५॥

शायशीवी करुनी, नमिते मी पूष्णा ॥ हरो माझी तृष्णा, देहातिल ॥८६॥

सत्यायशीवी केली, हिरण्यगर्भासी ॥ दिली ज्ञानराशी, प्रेमे त्याने ॥८७॥

अठ्याशीवी करुनी, वंदिते मरिचास ॥ करो तिमिरास, दूर माझ्या ॥८८॥

एकोणनव्वदाव, केली आदित्यास ॥ संसृतीचा पाश, तोडी माझा ॥८९॥

नव्वदावी करुनी, वंदिते सविता ॥ देतो जो जगता, प्रकाशासी ॥९०॥

एक्याण्णवावी करुनी, वंदीला मी अर्क ॥ वर्णिता कवितर्क, खूंटले ज्या ॥९१॥

ब्याणणावी करुनी, वंदीला भास्कर ॥ नवग्रही थोर, हाचि देव ॥९२॥

त्र्याण्णवावी फेरी, करूनी प्रभाकरा ॥ जोडिते मी करा, घडोघडी ॥९३॥

चवर्‍याण्णवावी केली, सहस्त्रकिरणा ॥ सर्वांच्या तो प्राणा, रक्षितसे ॥९४॥

पंचाण्णवावी केली, सूर्यनारायणा ॥ येऊ दे करुणा, किंकरीची ॥९५॥

शहाण्णवावी करुनी, वंदी दीनपती ॥ तुजे पायी मती, नित्य जडो ॥९६॥

सत्याण्णवावी फेरी केली तमोहरा ॥ ज्ञानोदय करा, देही माझ्या ॥९७॥

अठ्याण्णवावी करुनी, दोकर जोडिले ॥ अर्घ्यदान दिले, प्रातःकाळी ॥९८॥

नव्याण्णवावी करुनी, धरी पाय तुझे ॥ हरी दोष माझे कृपावंता ॥९९॥

पंचायतन देवा शत भावे केल्या ॥ कृष्णेने या फेर्‍या, भ्रमनाशा ॥१००॥

करी प्रदक्षिना, शतावरि एक ॥ सद्गुरुची लेक, कृष्णाबाई ॥१०१॥

करी प्रदक्षिणा, शतावरि दोन ॥ सदगुरुचे सान कृष्णाबाई ॥१०२॥

करी प्रदक्षिणा, शतावरी तीन ॥ गुरुपदी लीन, कृष्णाबाई ॥१०३॥

करुनी प्रदक्षिणा, शतावरी चार ॥ पदी मागे थोर, कृष्णाबाई ॥१०४॥

प्रदक्षिणा करी, शतावरी पाच ॥ मोक्ष मागे साच, कृष्णाबाई ॥१०५॥

केल्या प्रदक्षिणा, शतावरी सहा ॥ दीन म्हणे पाहा, कृष्णाबाई ॥१०६॥

शतावरी सात, केल्या गुरुवरा ॥ मागे मोक्ष बरा, कृष्णाबाई ॥१०७॥

करुनी प्रदक्षिणा, शतअष्टोत्तर ॥ भजे निरंतर कृष्णाबाई ॥१०८॥

माळेमधे एक, राहे मेरुमणी ॥ करी तो घेवूनी नमे रामा ॥१०९॥

N/A

References : N/A
Last Updated : December 31, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP