सकुमार वनी धाडु नको श्रीराम ॥धृ०॥
पृथ्वि-पती मी स्त्री-लोभाने घालविला भगवान ॥स०॥१॥
सतत तुझ्या गे लाविन सेवे, देइ मला जिवदन ॥स०॥२॥
राज्यी स्थापिन भरत तुझा गे, घे रामाची आण ॥स०॥३॥
भरजरि पीतांबर सोडुनिया, करि वल्कल परिधान ॥स०॥४॥
राम-लक्ष्मण रथि बैसवुनिया, जनक-सुता गुणवान ॥स०॥५॥
खचित खरी तू निर्दय कैकई, केवळ पातक खाण ॥स०६॥
वेष्टिलि कृष्णा षट् शत्रूंनी, पाहु नको निर्वाण ॥स०॥७॥