मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
शांत दांत चपल मना होइ झडक...

मानसगीत सरोवर - शांत दांत चपल मना होइ झडक...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


शांत दांत चपल मना होइ झडकरी ॥

त्यजुनि सकल मोहपाश भजे श्री हरी ॥धृ०॥

मृत्तिकेच्या मंदिरासि काय करिसि तू ॥

अंतसमयि कोण मना सांग स्मरसि तू ॥

अग्निसंगे भस्म होइ जासि यमपुरी ॥शांत०॥१॥

मन्मथासि आवरुनी होइ तू भले ॥

धन, कन्या पुत्र जरी आजि साधले ॥

परिणामी कोणि न ये जाण अंतरि ॥शांत०॥२॥

राखि धैर्य तशी जवळ सतत शांति ते ॥

सुह्रद करी बोध-भाव विवेकसहित ते ॥

काम क्रोध श्रेष्ठ रिपू आधि संहरी ॥शांत०॥३॥

वासनेसि कल्पनेसि घालि बाहेरी ॥

उपरतीसि ठाव देइ आत्ममंदिरी ॥

मद-मत्सर थोर अरी त्यागि लवकरी ॥शांत०॥४॥

कृष्णेने गुरुवचनी भाव ठेविला ॥

पंचप्राणसहितचि त्या देह वाहिला ॥

दाखवि मज मार्ग सुलभ आस करि पुरी ॥शांत०॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 30, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP