मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
अरे नरा तू परात्परा त्या ...

मानसगीत सरोवर - अरे नरा तू परात्परा त्या ...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


अरे नरा तू परात्परा त्या पाहा त्यागुन या विषया ॥

फुकट फुकट हा काळ चालला जाइल नरतनु ही वाया ॥धृ०॥

उंच हवेली चढवुनि मजले बांधुनि बससी शाश्वतिचे ॥

नरउनि दारा उजळुनि दीपा भोगिसि भोग अशाश्वतिचे ॥

बागबगीच्या टेबल खुरच्या तांबुल गजरे मोगरीचे ॥

मऊ बिछान्यावरी लोळसिल मंचकि पडदे कुसरिचे ॥

बहु सुवासिक उट्या लाउनी रुमाल हाती ते जरिचे ॥

अशा आनंदी मग ते कैचे नाम येई मुखि श्रीहरीचे ॥चाल॥

झाले कन्या पुत्र तुला ॥ आली संपत बहुत तुला ॥

अगणित हुजरे लउनि तुला ॥ करिती मुजरे बघुनि तुला ॥

ताटि रुप्याच्या भोजन करिसी घेउनि व्याह्या जावया ॥अरे०॥१॥

संसारी तू करिसी खटपट हाव धरुनिया बहु विषयी ॥

हांजी हांजी करुनी तुजला रावबहादरि ती येई ॥

पूर्वपुण्य तव सुफल जाहले पुढे गती तरि कशि होई ॥

यासाठी तू सुविचाराने हरिभजनी नित रत पाही ॥

गर्वभार हा श्रीमंतीचा वाहु नको तू निज डोई ॥

तुजहुनि मोठे मोठे जगी या अगणित असती मिति नाही ॥चाल॥

सरे तरुणता भराभरा ॥ येई अंगी तुझ्या जरा ॥

काळ चालला झराझरा ॥ संनिध मृत्यू येत नरा ॥

पळ घडि थांबे म्हणावयासी, धैर्य नसे तुज त्या सगया ॥अरे०॥२॥

आयू सरता आप्त सोयरे जिवलग स्त्री-सुत होति दुरी ॥

जाण समयि त्या तुज सांगाते कोणि न येई खरोखरी ॥

मृत्यु पाश तुज घालुनि नेता कुडी पडे ती भूमिवरी ॥

नेति स्मशानी नर चौघे तनु घालुनिया तृण शजवरा ॥

सरण रचुनी अग्नि लाउनी येति भराभर सर्व घरी ॥

करिता तुज गुज गोष्टी सांगते आत्महिताचे काय करी ॥चाल॥

अरे अरे हरि भगवंता ॥

पुरे पुरे ही भवचिंता ॥ हरे हरे कथु किति आता ॥

सरो सरो हा मम गाथा ॥

हरिपदकमली रुंजि घालिते कृष्णा भ्रमरी होउनिया ॥अरे०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 31, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP