एकेचाळिसावी, केली केशवासी ॥ पुन्हा भवपाशी, घालू नको ॥४१॥
बेचाळिसावी झाली, पुरी नारायणा ॥ भानुज-यातना, चुकवी तू ॥४२॥
त्रेचाळिसावी केली, भावे म्या माधवा ॥ आरंभिला धावा, संकटी म्या ॥४३॥
चवेचाळिसावी, केली म्या गोविंदा ॥ तुजविण धंदा, दुजा नाही ॥४४॥
पंचेचाळिसावी प्रदक्षिणा केली ॥ विष्णुप्रत होवो, पावन ती ॥४५॥
शेचाळीसावी केली, मधुसूदनास ॥ कुळे बेचाळिस उद्धरी तो ॥४६॥
सत्तेचाळिसावी केली त्रिविक्रमा ॥ देई मज प्रेमा, नामी तुझ्या ॥४७॥
अठ्ठेचाळिसावी, केली वामनासी ॥ झाली या मनासी, उपरती ॥४८॥
एकोणपन्नासावी केली, म्या श्रीधरा ॥ उद्धार तो करा शीघ्र माझा ॥४९॥
पन्नासावी केली,तुज ऋषीकेशा ॥ वासना अशेषा, दूर करी ॥५०॥
एकावन्नावी केली, पद्मनाभास ती ॥ दुष्कृताची ग्रंथी, नाश पावो ॥५१॥
बावन्नावी केली, तुज दामोदरा ॥ चित्ती वास करा, नित्य माझ्या ॥५२॥
त्रेपन्नावी होता, माझी प्रदक्षिणा ॥तुज संकर्षणा, विनवीते ॥५३॥
चौपन्नावी करिते, तुज वासुदेवा ॥ संसारी विसावा, देई मज ॥५४॥
प्रद्युम्नास केली, पंचावन्नावी ती ॥ कष्ट दूर होती, भवाब्धीचे ॥५५॥
छपन्नावी करुनी नमी अनिरुद्ध ॥ भाव माझा शुद्ध, राहो सदा ॥५६॥
सत्तावन्नावी ती, पुरुषोत्तमा केली ॥ सर्व विसरली, काया माझी ॥५७॥
केली अठ्ठावन्नावी, मी ही अधोक्षजा ॥ वैकुंठाच्या राजा, धाव वेगे ॥५८॥
एकूणसाठावी, तुज नारसिंहा ॥ घेवो माझी जिव्हा, नाम तुझे ॥६९॥
साठावी ती फेरी, केली म्या अच्युता ॥ कृष्णा म्हणे आता, मुक्ति देई ॥६०॥