Dictionaries | References

आथी

   
Script: Devanagari
See also:  आथि

आथी

  पु. ( भिल्ली . ) हत्ती . [ सं . हस्ती ]
 क्रि.  
   ( जुनें मराठी काव्य ) आहे . आति पहा . पिंगलकु सिंह येथें आथि । - पंच १ . २४ . एतद्विषयीं विषाद । आथीचिना ॥ - विउ ८ . २९ . [ सं . अस्ति - अत्थि - आथि - आति ]
   ( भिल्ली ) होती . एक कुकडी ( कोंबडी ) आथी - भिल्ली भाषेंतील गोष्टी ९ .
०ला   
   झाला ; असला ; होता ; असणें या क्रियापदाचें भूतकालाचें जुनें रुप . कामें आथिला मैथुना रिघे ।
०लें   
   झालें ; आलें . वायूपोटीं पाहे तेज जन्मलें आपण । तेहि रे पांचागुणीं आथिलें जाण । - ब ५८७ .
   असलेलें ; असतें ; युक्त ; संपन्न ( कोणत्याहि गोष्टीनें ). नाथिलें चिंती तें अतिचिंता । आथिलें चिंती ते निश्चितता । - एभा २ . ४१४ .
०लेंपण  न. असतेपण ; अस्तित्व .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP