Dictionaries | References

मखलाशी

   
Script: Devanagari
See also:  मखलासी , मख्लशी , मख्लाशी

मखलाशी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

मखलाशी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  The passing of an account. Authorizing or sanctioning. Whitewashing, clearing from imputations.

मखलाशी

 ना.  वरवरची बोळवण , साफसुफी , सारवासारव ;
 ना.  टीका , भाष्य , मल्लीनाथी .

मखलाशी

  स्त्री. 
   हिशेब , कागदपत्र इ० मंजूर करणें ; तो बरोबर आहे असा , मान्यतेचा , पसंतीचा शेरा ; ( सामा . ) मान्यता ; मंजूरी .
   सनद , नेमणूक , इनाम , दस्तऐवज इ० मंजूर झाल्याबद्दलचा सरकारचा शिक्का , निशाणी , सही . यांचे यादींत मखलासी जाहली असे . - वाडदुबा ८४ .
   एकाखालीं एक रकमा मांडून केलेली गोळाबेरीज ; तेरीज .
   वादाचा निकाल ; निर्णय .
   फार देणें , घेणें असतां सरकार इ० पासून थोड्या द्रव्यानें करुन घेतलेली तोड . याची मखलशी करुन खरा होईल त्याचे स्वाधीन करावी . - वाडबाबा २ . ७१ .
   ( ल . ) साफसुफी ; सारवासारव ; वरवरची बोळवण .
   ( ल . ) टीका ; मल्लीनाथी ; भाष्य . [ अर . मुखल्लस = शुद्ध , बिनचूक ]
०करणें   सुधारणा करणें ; नीटनेटकें स्वरुप देणें . जें मनांत होतें तें एकदम बाहेर पडलें . आतां किती जरी कळाकुसरी आणखी मखलाशी केली तरी मी फसायची नाहीं .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP