Dictionaries | References

मुंगी

   
Script: Devanagari

मुंगी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . v ये, आण. 5 excitement, in the male, of the sexual passion. v ये. Pr. मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लाकडें खाऊं नयेत better be little and lowly with some comforts or pleasures than be great with all the hardships of greatness.

मुंगी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

मुंगी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एक बारीक कीटक   Ex. साखरेभोवती मुंग्या जमल्या होत्या
HYPONYMY:
ONTOLOGY:
कीट (Insects)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)

मुंगी

  स्त्री. 
   एक बारीक कीटक ; पिपीलिका ; गोड पदार्थ फार आवडणारा एक लहान प्राणी . गुरुचरणीं पार्थ जडे जैसी मधुशर्करारसीं मुंगी । - मोकर्ण ४३ . ५० . मुंग्यांचे प्रकार :- काडमुंगी , गांडमोडी , घाणेरी , ढुंगणमोडी , दांत्या , धांवरी , ( वळविंच ( ज ), हुरण , हुळहुळी , पिसोळी . इ० . - राको ७३ .
   एखादा झणझणीत पदार्थ खाल्यामुळें जिभेमध्यें होणारी रवरव .
   चेतना ; चेव ; एखादी गोष्ट करण्याविषयीं एकदम उत्पन्न झालेली उत्सुकता ; तीव्र इच्छा . ( क्रि० येणें ; आणणें ).
   पुरुषांच्या ठिकाणीं उत्पन्न होणारा कामविकाराचा प्रक्षोभ . ( क्रि० येणें ) मग मुंगी येउनी लुंगी कासोटी । सोडूनि धावती तयांचे पाठी । - नव २५ . ५८ .
   शरीरास आलेली बधिरता . ( क्रि० येणें ). [ दे . मुअंगी ] म्ह०
   मुंगीला मुताचा पूर .
   मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें खाऊं नयेत . ( वाप्र . ) मुंग्या येणें , चढणें - वातविकारामुळें शरीरावयव जड होऊन त्यास बधिरता येणें . रुधिराभिसरण रुद्ध झाल्यामुळें येणारी बधिरता . मुंगीच्या पावलानें - क्रिवि . मुंगीच्या गतीनें ; अगदीं हळू हळू . मुंगीच्या पायानें येणें आणि हत्तीच्या , घोड्याच्या पायांनीं जाणें - सावकाश येणें आणि त्वरेनें निघून जाणें ( संपत्ति , वैभव वगैरे संबंधीं योजतात ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP