|
स्त्री. पु. अपराध . त्यजिले खळ सुत कविनीं पाहुनि सत्संग्रहांत अत्याग । - मोसभा ४ . १६ . नागवधूतें जाणों पाजी वर दुग्ध करुनिया आग । - मोसभा ६ . ४३ . [ सं . आगस ] विस्तव ; अग्नि ; विस्तवाचा भडका ; ज्वाला . भाजणें ; पोळणें ; काहील होणें ; दाह होणें . हातांपायांची आग होत आहे , कांहीं सुचत नाहीं ! ( ल . ) राग ; क्रोध ; संताप तनुला जाळी । आग भडकली । आवेश ; ताव ; तडफ ; फाजील उत्कंठा . सत्कारुनि म्हणें जी यावें सदभाषणें न आग मनीं । - मोवन ४ . ५४ . ताप , ज्वर ( येणें ). दारुगोळ्याचा - तोफेचा भडिमार . मोंगलाची आग भारी . ( ल . ) तोफखाना ; तोफ . मन्सूरअली याजपाशीं आग भारी म्हणून भडभुंजे अभिधान होतें - भाब २७ . [ सं . अग्नि ; प्रा . अगणी - अग्गी ; पं . अगन ; बं . आगुन ; हिं . अगनी . ] ०असणें एखाद्या गोष्टीची फार उत्कंठा असणें ; तीव्र इच्छा असणें . ०उठणें पडणें - ( पोटांत )- अतिशय भूक लागणें . ०ओतणें आग पाखडणें ; संकट आणणें . अन्यायानें लोकांवर आग ओतली गेली आहे . - विक्षिप्त १ . २० . ०झाडणें पाखडणें - एखाद्यावर अतिशय दोषारोप करणें ; शिव्यांचा वर्षाव करणें ; निंदा करणें ; कठोरपणें बोलणें ; रागें भरणें . नाहक सख्या आग मजवर पाखडली रे . - प्रला १८७ . जीवर नित्य करीं अनुराग । तिजवर झाडितसें मी आग ! ॥ - उत्तरराम ( गोडबोले ) पद ७८ . ०घालणें आग लावणें निजामल्लीनें पुण्यास वेढा देऊन आग घातली . - विवि ( १८७६ ) ८ . ६ . १०९ . ०मारणें ( यंत्र . ) कोळसा घालणें . बॉयलरांत आग मारतेवेळीं - एंजिनिअरिंगची तोंडी परीक्षा ( वावीकर ) १२ . ०रिघणें सती जाणें . ०लागणें धान्य , वस्त्र इ० महाग होणें . ( लागो ) नाश होवो ! जळो ! मरो ! इ० उदगार . आग लागो या राजकारणाला ! - तोबं १९ . ०लावणें दुही माजवणें ; भांडण उपस्थित करणें ; कलागत लावणें . या कारटीनें आग लावून दिली असेल . ही मोठी चोमडी आहे असे आजोबांच्या तोंडचे शब्द माझ्या कानीं पडले . - पकोघे . म्ह० आग लावील आणि विझली कीं नाहीं जाऊन पाहील = जो लोकांमध्यें आधीं भांडणें लावून त्याचा परिणाम काय होईल , भांडणें कशीं मिटतील अशी काळजी वाहतो असें बाह्यात्कारी दाखवितो अशा विघ्नसंतोषी मनुष्यास ही म्हण लावतात . आगलाव्या बोंबमार्या = आपण दुष्कृत्य करुन तें दुसर्यावर घालणारा . ०वरसणें धान्याची , फळांची , गुळाची , तुपाची , लाडवांची आग वरसणें म्हणजे ते ते जिन्नस पुरुन उरण्याइतके प्रचुर होणें . म्ह० आग हातीं धरवेल पण ( हा ) हातीं धरवणार नाहीं . हें वाक्य एखाद्या तामसी , एककल्ली , विलक्षण स्वभावाच्या माणसास लावतात . आगीवांचून कढ नाहीं आणि मायेवांचून रड नाहीं . आगींत उडी घेणें , घालणें , टाकणें - धोक्याच्या धंद्यांत , उद्योगांत , कामांत धाडसानें शिरणें किंवा हात घालणें . आगींत किंवा आगीवर तेल ओतणें , घालणें - भांडण चाललें असतां तें आणखी चिडीस नेणें . तुल० दीप्तालय विझवाया दाटुनि घालील कोण तेलातें . - मोउद्योग ४ . ९ . आगींत तावून काढणें - पक्क्या कसोटीस उतरविणें . आगीवांचून धूर निघत नाहीं - कांहीं तरी मुळांत खरें असल्याशिवाय बाहेर उगीच भुमका उठत नाहीं . या अर्थानें अशाच दुसर्या म्हणी - वार्याशिवाय लाट उठत नाहीं ; पिकल्याशिवाय विकत नाहीं इ ०आगी भय ( आगीपासून व वार्यापासून ) - जरीमरीचें भय . आगी वार्याचे दिवस - ज्या दिवसांत वावटळी फार सुटून गवत , केरकचरा वगैरे चोहोंकडे उडतो ( व आगीहि लागतात ) ते दिवस . ( क्रि० होणें , लागणें , सुटणें ). [ आग + वारा ] आगीस पडणें - ( व . ) धडपडणें ; हावरेपणानें - अधाशीपणानें काम करणें . कोणी आग व्हावें कोणी पाणी व्हावें - कोणी भांडण काढावें कोणी मिटवावें . म्हणजे ( ल . ) कांहीं माणसें एका स्वभावाचीं असावींत व कांहीं निराळ्याच स्वभावाचीं असावींत , कांहीं चपळ व तत्पर असावींत व कांहीं जड व शांत असावींत अशा वेळीं उपयोग . ( कोणाच्या ) आगीदुगींत नसणें - अध्यामध्यांत नसणें ; संबंध न ठेवणें . आगींतून निघून फोंफोट्यांत जाणें , पडणें - एका संकटांतून निघुन दुसर्या संकटांत पडणें . तळपायाची आग मस्तकास जाणें - अतिशय राग येणें . तळव्याची चढली आग । मस्तकास जाउनि भिडली । - संग्रामगीतें ५८ . कोरडी आग पुरवते पण ओली पुरवत नाहीं - विस्तवाची आग पुरवते पण भुकेचा त्रास सोसवत नाहीं . वार्याचें भय ( आगीपासून व वार्यापासून ) - जरीमरीचें भय . आगी वार्याचे दिवस - ज्या दिवसांत वावटळी फार सुटून गवत , केरकचरा वगैरे चोहोंकडे उडतो ( व आगीहि लागतात ) ते दिवस . ( क्रि० होणें , लागणें , सुटणें ). [ आग + वारा ] आगीस पडणें - ( व . ) धडपडणें ; हावरेपणानें - अधाशीपणानें काम करणें . कोणी आग व्हावें कोणी पाणी व्हावें - कोणी भांडण काढावें कोणी मिटवावें . म्हणजे ( ल . ) कांहीं माणसें एका स्वभावाचीं असावींत व कांहीं निराळ्याच स्वभावाचीं असावींत , कांहीं चपळ व तत्पर असावींत व कांहीं जड व शांत असावींत अशा वेळीं उपयोग . ( कोणाच्या ) आगीदुगींत नसणें - अध्यामध्यांत नसणें ; संबंध न ठेवणें . आगींतून निघून फोंफोट्यांत जाणें , पडणें - एका संकटांतून निघुन दुसर्या संकटांत पडणें . तळपायाची आग मस्तकास जाणें - अतिशय राग येणें . तळव्याची चढली आग । मस्तकास जाउनि भिडली । - संग्रामगीतें ५८ . कोरडी आग पुरवते पण ओली पुरवत नाहीं - विस्तवाची आग पुरवते पण भुकेचा त्रास सोसवत नाहीं .
|