विविधविषयपर पदे - कलिवर्णन
श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.
११७७.
( राग-देस; ताल-दादरा )
काळाची गती । भले नष्टाला भिती ।
चतुर ते हि अतुर होऊन वर्तो लागती ॥ध्रु०॥
न्याय बुडाला अवघा अन्याय जाला ।
कोणी कोणा विचारीना अवघा गलबला ॥१॥
सगट सारिखे कोठे जावे विवेके ।
सत्याला गोंविले वेढा लाऊनि मायिके ॥२॥
खरा आणि खोटा अवघा जाला गळाठा ।
दास म्हणे कलियुगाने मोडिल्या वांटा ॥३॥
११७८
( चाल-निर्गुणरुप मि० )
पळ पळ पापकळी रे । हेत बरा निवळी रे ॥ध्रु०॥
न्यायनीति बहुतेक बुडाली । एक अनेक छळी ॥१॥
दास म्हणे जन पावन सज्जन । ते एक थोर बळी ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : February 10, 2011
TOP