भक्तिपर पदे - भाग ३

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे


१३५१
( राग-भीमपलासी; ताल-धुमाळी; चाल-गावें रे नाम० )
जाले रे धन्य जाले रे ॥ध्रु०॥
हरिभजन जन करित गेले । तेचि निवाले रे ॥१॥
सारासार विचारें पुनीत जाले । संसारीं सुटले ॥२॥
दास म्हणे विविकेंचि विराले । सज्जन जाले रे ॥३॥

१३५२
( चाल-नामामध्यें उ०  )
जीवींचा जिव्हाळा आत्मारामरावो । जाणतो सकळ माझा अंतर्भावो । त्यासी तुम्ही एक वेळ भेटवा वो ॥ध्रु०॥
रूप रामरायाचें देखिलें वो । त्याचे चरणीं मानस माझें रंगलें वो। चित्त हें विव्हळ रामें वेधिलें हो ॥१॥
कोंवसा असतां माझ्य़ा शिरावरीं । संसारीं गांजिलें येणें दुराचारों । आतां मज कंठवेना क्षणमरी ॥२॥
शरयूतीरीं स्वामी माझा नांदताहे । हनुमंत सेवक त्याचे घरीं आहे । निरोप सांगा रामदास वाट पाहे ॥३॥

१३५३
( राग-रामकली; ताल-धुमाळी )
संदेह फेडियला देहाचा । रामरूप सांगतां खूंटल्या चारी वाचा ॥ध्रु०॥
मन संदेहाचे संगतीं रंजीस आलें । किती वेळ बापुडें आलें गेलें । रामरायानें तया आपंगिलें रे ॥१॥
रामपदांबुजें शोमतीं गोमटीं । वांकी गजरें बोमाटती । रामदास सोडीना पडली पायीं मिठी ॥२॥

१३५४
( चाल-रामा कृपा बहुत० )
रामाचा वेधू लागला गे; बाईये प्रेमा स्वरूपीं गुंतला ॥ध्रु०॥
वारीजदळनयनीं गे बाईये । वृत्ती गुंतली जाऊनी ॥१॥
उरल्या देहाचें कारण गे बाईये । सूर्यवंशाचें मंडण ॥२॥
रामदासाचें मूळ गे बाईये । रामचि हा सकळ ॥३॥

१३५५
( राग-काफी; ताल-दादरा )
भाव नको भाव नको भाव नको वरपांग ॥ध्रु०॥
रामकथा निरूपणीं देव गुणीं आठवितां ॥१॥
नित्या काळ भक्त जीनस आठवितां ॥२॥
रामदास म्हणे आतां गुण गातां आवडीनें ॥३॥

१३५६
( राग-मैरव; ताल-धुमाळी )
वेड लागलें । हरीचें वेड लागलें ॥ध्रु०॥
चळवळ चळवळ जिकडे तिकडे । रूप चांललें ॥१॥
जळ स्थळ काष्ठ पाषाण पाहे । तेथें दिसत आहे ॥२॥
देहे मात्न तितुका हरीमंदिर । तेणें जागलें ॥३॥
दास म्हणे तो निरावेव । अंतरवासी देव ॥४॥

१३५७
( राग-काफी; ताल-दीपचंदी )
दया रघुनाथजीची । चुकवी सकळ जनचीची ॥ध्रु०॥
आगमनिगम शेष विरंची । स्थिति नये दयेची ॥१॥
सर्व काळ भडस पुरे मनाची । कोण सिमा महिमेची ॥२॥
दास म्हणे मज बुद्धि तयाची । उत्तम कीर्ति जयाची ॥३॥

१३५८
( राग-काफी; ताल-दीपचंदी )
दीनांचा देव दयाळु । सकळ भुवनपाळु ॥ध्रु०॥
त्नैलोक्याची चिंता वाहे । नानापरी रक्षिताहे ॥१॥
वेळेसी पावे आनंद फावे । महिमा कीर्ती दुणावे ॥२॥
दास म्हणे तो वर्तवितो तो । द्दढ धरा ह्रदईं तो ॥३॥

१३५९
( राग-कामोद; ताल-धुमाळी; चाल-कारण० )
सगुणा सगुण भेटे । अंतरीं आनंद लोटे । येकसरां तुटे संदेह रे ॥ध्रु०॥
मनाऐसी मिळणी प्रीति वाढते दुणी । सगुण जाणती गुणी संत रे ॥१॥
प्रीति सांगतां न ये । सांगावें कोणसी काये । सज्जना मिळतां होये सूख रे ॥२॥
रामीरामदास म्हणे । सुजाती पालर्टो नेणे । प्रीति लागली तेणें गुणें रे ॥३॥

१३६०
( राग व चाल-वरील )
पाहतां सकळ लोक । रामाचे उपासक । देखतां परम सुख वाटे रे ॥ध्रु०॥
प्रीति लागली मना । गुंतली वासना । आणिक वसेना रामेंविण रे ॥१॥
जैसें तेम गंगाजळ । तैसे गुण निर्मळ । ऐकतां विमळ मन माझें रे ॥२॥
रामीरामदास म्हणे । मनें घेतलें धरणें । तयासि करणें काय आतां रे ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 16, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP