उपदेशपर पदे - भाग २

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे


१४४१
( राग-कामोद; ताल-दादरा; चाल-कारण पाहिजे० )
मनासी लगली चट । वांयाचि खटपट । करी वटवट । रामेंविण रे ॥ध्रु०॥
उणें हें येकाचें येक । पहाती सकळ लोक । राहिला विवेक । राघवाचा रे ॥१॥
मत्सर आठवें पोटीं । पडिल्या दुःखाच्या गाठी । होतसे हिंपुटी । वांयाविण रे ॥२॥
रामदास म्हणे राम । सोडितां होय विराम । राहिला विश्राम । तेणें गुणें रे ॥३॥

१४४२
( चाल-सामर्थ्याचा  गामा० )
जनक जननी माया । करिती नाना उपाया । पाळिती सकळ काया । कृपाळुपणें स्वाभावें ॥ध्रु०॥
सांगावें नलगे कांहीं । मागावें नलगे कांहीं । बाळका चिंताचि नाहीं । रुदनबळ तें जाणें ॥१॥
शृंगार करिती लोभें । हाणति मारति क्षोभें । आवडिच्या लोभें लोभें । जननी जनाक सर्वे ॥२॥
जननी जनक जन । वाढताहे तन मन । दास म्हणे गुणसंपन्न । देवाधिदेवाचें देणें ॥३॥

१४४३
( राग-बिहाग; ताल-दादरा. )
कांहीं एक रुचि तों बरें । अरुचिनें मन-मंग ॥ध्रु०॥
दूध तूप साय साखर मांडे । आलें निंबें दहिं भात ॥१॥
मक्ष ओदन परमान्न प्रकारें । लेह्य पेय चोष्य खाद्य ॥२॥
मित्न सखे इहलोक परत्नीं । आवडीनें अलोलिक ॥३॥
अंतर राखे तो सुख चाखे । दास म्हणे हें प्रमाण ॥४॥

१४४४
( राग-कल्याण; ताल-दीपचंदी )
कांमुललासी ॥ध्रु०॥
कैचें घर कैचें दार । मिथ्या सकळहि व्यापार । अंतीं सोयरा रघुवीर । कां भुललासी ॥१॥
कोणी नव्हेति रे कोणाचीं । सकळही सांगाती दैवाचीं । घरीं सोई त्या रामाची । कां भुल० ॥२॥
बहु अवघड आहे घाट । कैसी न कळे उरकेल वाट । होईं रघुविरजीचा भाट । कां भुल० ॥३॥
फिर माघार परतोन पाहें । एक धर्मचि होउनि राहें । धन जोडिलें न राहे । कां भुल० ॥४॥
ऐसी करावी बा जोडी  । राहे यथें तेथें गोडी । सोडी । सोडी मिथ्या प्रपंचओढी । कां भुल० ॥५॥
केव्हां जाईल न कळे श्वास । राहे तें घर पडेल वोस । ये कुडिया उपजेल त्रासा ॥ कां भुल० ॥६॥
सावध होईं रे वा ऐसाअ । ओढीं जळते घरिंचा वांसा । स्मर माझ्या रमाधीशा ॥ कां भुल० ॥७॥
संसार पाण्याचा बुडबुडा । याचा नको करुं ओढा । तूं समजसीना मूढा । कां भुल० ॥८॥
करीं सिताराम मैत्र । होईला देह तुझा पवित्न । वरकड मिंतीवरील चित्र । कां भुल० ॥९॥
कां रे बैसालास निश्चळ करिशिल अनर्थास मूल । सांडुनी विश्रांतीचें स्थळ । कां भुल० ॥१०॥
मुख्य असूं द्यावी दया । नाहीं तर सर्वही जाईल वाया । मिठी घाली रामराया । कां भुल० ॥११॥
करिशील डोळ्याचा अंधार । पाहें जनासी निवैंरें । सांडीं धन संपत्तीचें वारें । कां भुल० ॥१२॥
अंगीं धनसंपत्तीचें वारें । खाया मिळतील मुतें पोरें । कामा न येत रे निर्घारें । कां भुल० ॥१३॥
रामदासाचें जीवन । तूं कां न करिसी साधन । राम तोडिल भवबंधन । कांज भुल० ॥१४॥

१४४५
( राग-जोगी; ताल-दीपचंदी )
रे वेडिया तारुण्याचा कोण भर्वसा । व्यर्थ वेचूं नको वयसा ॥ध्रु०॥
हात पाय वागतां बरें । कोणी कामा  नये दुसरें । दुःख होईल येकसरें रे रे रे । बहु सावध असतां बरें ॥१॥
कोण समयो येईल कैसा । याचा न कळे कीं भर्वसा । काळ मांडुनि बैसला फांसा रे येकायेकी होईल वळसा रे ॥२॥
स्वप्र संसार बाजीगरी । नेणतयासी वाटे खरी । व्यर्थ काय भरसी भरीं रे । हे अवघीं वोडंबरी रे ॥३॥
एक वाढती एक मोडती । एक जाती एक पाहती । हित जातें हातींचें हातीं रे । दास म्हणे घरीं सत्संगति रे० ॥४॥

१४४६
( राग-कामोद; ताल-धुमाळी )
देवासि जाऊनि वेडे आठवी संसारकोडें । रडतें बापुडें दैन्यवाणें रे ॥ध्रु०॥
मागील आठवण करितां होतसे सीण । दुःअख तें कठिण समागमें रें ॥१॥
त्यागूनि निरूपण हरिकथाश्रवण । लगलें भांडण एकमेकां रे ॥२॥
रामीरामदास म्हणे कपाळ जयाचें उणें । देवासि जाऊन दुःख दुणें रे ॥३।

१४४७
( राग-श्रीराग; ताल-धुमाळी )
तैसा हा संसार कैसा लोकाचार । जाणें सांडुनि जोजार सत्य उत्तर ॥१॥
सत्य वाटतें मनीं दोनी दिवस जनीं । पुढें जाईल निदानीं प्राण निघोनि ॥२॥
दास म्हणे नरहित अगोदर । मग खुंटेल उत्तर राहे शरीर ॥३॥

१४४८
( राग-कानडा ताल-दीपचंदी )
पावनें पावन केलें । सूक्ष्म द्दष्टी करुनि सृष्टिअंतर काढुनि नेलें ॥ध्रु०॥
देव कळेना पुण्य कळेना बुडत हो तपेलें ॥१॥
किती मरावें किती फिरावें । आयुष्य व्यर्थचि गेलें ॥२॥
विषयरसरंगें मन तरंगे । दास म्हणे वय गेलें ॥३॥

१४४९
( राग-गौडमल्हार; ताल-त्निताल )
सुख नाहीं रे नाहीं रे । संसारीं सुख नाहीं ॥ध्रु०॥
वैमव संपत्ति संपंत्ति । सवें होती विपत्ति ॥१॥
सुख वाटतें वाटतें । सवें चि दुःख होतें ॥२॥
घर सुंदर सुंदर । टाकुनि जावें सारें ॥३॥
शेवटीं निरास निरास । सांगे रामदास ॥४॥

१४५०
( चाल-डफगाण्याची )
वितभर पोटासाठीं । येवढी होते आटाआटी । काय होईल शेवटीं । तें कळेना ॥१॥
यावें जावें यावें जावें । किती हिंडाबें फिरावें । शागीर्दानीनें कष्टावें । पेरोसानी ॥२॥
मनामध्यें आले वाज । परि या लोकिकाची लाज । मग होउनि निर्लज्ज । जाजावले ॥३॥
कुबल्ल संसाराच्या वोढी । येवढी होती तडातोडी । नाना संकटें सांकडी । चिंता लागे ॥४॥
दास म्हणे अनुभवलें । अवघें जाणोनि त्यागिलें । रुणानुबंधें विमागलें । ठाईं ठाईं ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 16, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP