उपदेशपर पदे - भाग ८

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे


१५०१
( राग-श्रीराग; ताल-धुमाळी. )
म्हणोनियां सावधान ॥ रामीं अनुसंघान ॥ करी हें निश्चळ मन ॥ विवेकबळें ॥ध्रु०॥
होणार कांहीं कळेना ॥ प्रारब्ध कदा पालटेना ॥ प्रपंच सकळ येना समागमें ॥१॥
जन जातो येकलाचि ॥ आपणांहीं मार्ग तोचि ॥ नाशिवंत शरिराची ॥ दुराशा नको ॥२॥
रामीरामदास म्हणे ॥ सकळ सांडुनि जाणें ॥ आहे रे होणें ॥ न घडे अंतीं ॥३॥

१५०२
( राग-कल्याण; ताल-धुमाळी )
गल्बला गल्बला बहु गल्बला जनीं । निवळ निवळ काळ आवडे मनीं । त्यजुनी सकळ जावें आटव्य वनीं । विचार पाहतां मनीं होय उन्मनी ॥ध्रु०॥
सुचित असतां बुद्धि संभवते । दुश्चित होतां सिद्धी धारणा जाते । वृत्ति वाढवितां ते ब्रह्यांड मेदिते । संकोच करितां लज्जा बहुत येते ॥१॥
निवळ बोलणें निवळ नेटकें गाणें । निवळ दस्तकी निवळ तानमानें । निवळ प्रबंद निवळ वाजवणें । तयाचे संगतीं वेडे होती शाहाणे ॥२॥
दास म्हणे जनीं मनें वळा निवळा । बहुत सरस रम्य गायनी कळा । जाणता सुघड त्यासी होय सोहळा । निवळ जाणता तो गलबल्यावेगळा ॥३॥

१५०३
( राग-कल्याण; ताल्ल-त्निताल; चाल-अरे नर सार वि० )
सुंदरपण जेणें । तें कोण जाणें ॥ध्रु०॥
चंचळ चंचळ चळवळ चळवळ । नाटक नेटका हो ॥तें०॥ ॥१॥
इंद्र चंद्र हरि हर विरंची । गंधर्व नर नृपति ॥तें०॥ ॥२॥
कृष्ण गोपिका सुंदर नारी । कामकळामोहनी ॥तें०॥ ॥३॥
कुंतळ भाळ रसाळ सुलोचन दशन वसन झमके ॥ते०॥ ॥४॥
यौवन मारमारें बिक दाटे । संपन्न योगलीळा ॥तें०॥ ॥५॥
धूर्त चतुर प्रेमारस बाणे । मृदु वचनीं वदनीं ॥तें॥ ॥६॥
रसिकराय अंतरीं जागे । तेणें चटक नटली ॥तें०॥ ॥७॥

१५०४  
( राग-पहाडी; ताल-धुमाळी० )
सत्य मानावी माझी वाचा । राम निजांचा । नाहीं भरंवसा संसाराचा । संग चोराचा ॥ध्रु०॥
वैमवें व्यर्थ नाचा । हा तों विवेक काचा ॥१॥
प्रपंचालागीं वेंचा । मार्ग नाहीं देवाचा ॥२॥
देव रामदासाचा । तारक निर्वाणींचा ॥३॥

१५०५
( चाल-धर्म जागो० )
पराधीन होऊं नये । तेणें बुडतो उपाय । आयुष्य हें वायां जाय । मूर्खाला हें कळे काय ॥ध्रु०॥
मूर्खाचे संगतीनें । सदा मंगती मनें । रानटापासीं जातां । कुचंबती सुमनें ॥१॥
सलगीच्या लोकांमध्यें । अखंड राहणें तेथें । अनुमानाचेनि पंथें । सुख होय पालथें ॥२॥
आपुले लोक व्हावें । तेचि बैरी जाणावे । संकटीं मनुष्य कावे । तेथें कांहींच न फावे ॥३॥
बोलती शहाणपणें । परि ते अवघे मूर्खपणें । तयासी सिकवी कोणें । अवघे संसार कठिण ॥४॥
दास म्हणे ऐसें आहे । हित आपुलें पाहे । सर्वकाळ चिंता वाहे । तोचि निःसंग राहे ॥५॥

१५०६
( राग-काफी; ताल-धुमाळी. )
ऐसें आहे विचारें पाहें । सावध राहें कांहीं न राहे । विवेकानें सर्वत्न लाहे ॥ध्रु०॥
जुनें होतें सामर्थ्य जातें । कांहीं एक ऐसें जें तें । वृद्धपणीं जडत्व येतें ॥१॥
इहलोक आणि परलोक । दोहींकडे व्हावा । विवेक । कामा नये तो अविवेका ॥२॥
होत स्वभावें जात स्वभावें। विचित्न माया काय नेमावें । नेम धर्म सांडुन जावें ॥३॥
सारासार विचार थोरा । विचारानें पाविजे पार । सर्व कांहीं कळे निर्धारें ॥४॥
दास म्हणे सावध होणें । मूर्खपणें नासतें जिणें । दोहीं लोकीं लाजिरवाणें ॥५॥

१५०७
( राग-भूप; ताल-दादरा. )
कोणा कळेना कळेना त्या पंथा नवजावें । जड उपाधी उपाधी लागुनि त्यजावें । देव पावन पावन त्यालागिं भजावें । पुढें श्रवण मननें सर्व उमजावें ॥ध्रु०॥
शांति क्षमेनें क्षमेनें कोपाला कुटावें । सार विचारें विचारें असार लुटावें । मन चंचळ चंचळ विवेकें पिटावें । नको मीपण मीपण ज्ञानें निवटावें ॥१॥
स्थळ घरावें घरावें पाहोनि शाश्वत । मागें सांडावें सांडावें सर्व अशाश्वत । पंचभूतिक भूतिक अवघें नाशिवंत । अंत नाहीं रे नाहीं रे भजे तो अनंत ॥२॥
दास म्हणे रे म्हणे रे दास्यत्व करावें । भक्तियोगें रे योगें रे जन उद्धरावे । दया देवाची देवाची सर्वत्रीं पुरावें । वृत्ति संमंधें संमंधें कांहींच नुरावें ॥३॥

१५०८
( राग-सोहोनी, ताल-धुमाळी. ) ऐक रे साधका मनीं घरिं आपुलें हित । सांडुनि अहंभाव भावें भज रे भगवंत ॥ध्रु०॥
घरासि संत आला म्हणुनी बोलुनि शिणवावा । ऊंस गोड जाला म्हणुनी मुळ्यांसकट खावा । प्रीतिचा पाहुणा जाला म्हणुनी बहुत दिवस राहावा । गांवचा प्रमु जाला म्हणुनि गांवचि बुडवावा ॥१॥
आंगा आली महंती म्हणुनी भलतेंचि बोलावें । फुका हिरा जाला म्हणुनी कवडिस जोडावें । भगवें वस्त्र केलें म्हणुनी जनांसि भोंदावें । व्याजबट्टा घेतो म्हणुनी मुदलचि बुडवावें ॥२॥
देवा आंगीं विंचू म्हणुनी कंठीं कवळावा । फुका हत्ती जाला म्हणुनी भलत्यानें घ्यावा । चंदन शीतळ जाला म्हणुनी उचलोनी प्यावा । वडील रागें आला म्हणुनी जिवेंचि मारावा ॥३॥
परस्त्री सुंदर जाली म्हणुनी बळेंचि भोगावि । सखा मित्न जाला म्हणुनी बाईल मागावी । सोन्याची सुरी जाली म्हणुनी पोटीं खोंवावी । मखमल पैजार जाली म्हणुनी डोईवर घ्यावी ॥४॥
सद्‌‍गुरु सोयरा जाला म्हणुनी आचार बुडवावा । देव नित्य भेटे म्हणुनी जनांसि दावावा । प्रत्यक्ष दीप जाला म्हणुनी वळणिस खोंवावा । रामदास म्हणे हरि हा भावें वळगावा ॥५॥

१५०९
( चाल-धर्म जागो० )
जाणत्याचा संग घर । हित आपुलें करा । न्याय नीति प्रचितीनें निरूपणें विवरा ॥ध्रु०॥
आत्महित करीना जो । तरी तो आत्मघातकी । पुण्यामार्ग आचरेना । तरीतो पूर्ण पातकी ॥१॥
आपुली वर्तणुक । मन आपुलें जाणें । पेरिलें उगवतें । लोक जाणती शाहणे ॥२॥
सुख दुःख सर्व चिंता । आपुली आपण करावी । दास म्हणे करूनियां । वाट सुखाची घरावी ॥३॥

१५१०
( राग-तिलंग; ताल-धुमाळी ) नको भगवंतासी वरपांग ॥ध्रु०॥
भजनध्यान अखंड करावें । मन धरितें जंग ॥१।
काळवेळा अवघी समजेना । कोण पडेल प्रसंग ॥२॥
मायाजाळीं हें मन स्वजन । होउनि जालें दंग ॥३॥
अंतर वेधत वेधत जावें । राखावा निजरंग ॥४॥
दास म्हणे होणार कळेना । पडत जाति विलंग ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 20, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP