कुलदैवत - गिरजा
मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
आलं गंगाला मागनं बसानेला टाका पिढं पाट
पुसा याची जात गोत याची जात धनगराची
आमची गंगा बामनाची गंगा द्यायाची न्हाई
जागा पाहू जागाईत मळा पाहू बागाईत
नवरा पाहू रुपशाही तिथं देऊ गंगूबाई
गंगू ऐकेनाशी झाली गेली आईच्या जवळी
आगं आगं माझ्या आई आपल्या बारवाच्या तिरी
एक जोगी नवलापरी आपली सोन्याची किंकरी
वाजवितो नवलापरी मी जाते त्याच्या घरी
येडी झाली गंगूबाई जागा पाहू जागाईत
मळा पाहू बागाईत नवरा पाहू रुपशाही
तिथं देऊ गंगूबाई गंगा ऐकेनाशी झाली
गेली बापाच्या जवळी अरे अरे माझ्या बापा
आपल्या बारवाच्या तिरी एक जोगी नवलापरी
गंगा त्याजला वरी येडी झाली गंगूबाई
जागा पाहू रुपशाही तिथं देऊ गंगूबाई
गंगू ऐकेनाशी झाली गेली मान मुरडोनी
गेली वल्या पदरानी लागली पहिल्या वनाला
उभा र्हा तू गड्या माझी पावलं वडती
घरी पिताजी रडती
लागली दुसर्या वनाला उभा उभा र्हा तूं गड्या
माझी पावलं वडती घरी पिताजी रडती
एवडी पित्याची फेरी मी का जोग्याची बरी
लागली तिसर्या वनाला उभा उभा र्हा तूं गड्या
मला सराटं मोडती घरी बंधूजी रडती
एवडी बंधवाची फेरी तूं का जोग्याची बरी
चवथ्या पाचव्या वनाला आलं जोग्याचं नगर
गंगा घातली जटेत मग गेलाय मळ्यात
गिरजा गेली शेजघरी दिलं अंघूळीला पानी
पहिला तांब्या जटंवरी मग तांब्या अंगावरी
गिरजा गेली सेजघरी आकाशाच्या आयाबाया
पहिला तांब्या जटंवरी मग तांब्या अंगावरी
असू दे ग गिरजाबाई त्याचा विचार असल काही
N/A
References :
संग्राहक: श्री. शा. रा. बाबर
Last Updated : October 17, 2012
TOP