कुलदैवत - भिल्लीण
मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
गिरजा झाली असी उदास
निघाली शंभू शोधायास
पालटिला तिने दुसरा वेश झाली भिल्लीण
मशी बोल भिल्लीणी सदाशिव म्हणे
चोळी ल्यालीसे उरफाटी मोहनमाळ हार कंठी
टिकली ल्यालीसे लल्लाटी नाकी मोरणी
बुचडा बांधीला केसांचा
वरती तुरा खोवी मोत्याचा
झणकारा मारी नेत्रांचा पाडिला भुलवूनी
शंभू बघूनी मोहित झाला
हात हा गिरजेवर टाकीला
नको तापसी झोंबू अंगाला बोला दुरुनी
दुर्गा म्हणे योगीराया
कैसी भोगितसा पर जाया
तुमचे तप हे जाईल वाया मुळापासूनी
गिरजा बोले नीलकंठा
तुम्ही तर दिसता बहू तापट
एकीचा नाही केला शेवट दिली सोडूनी मशी बोल
गिरजेने शंभू हाती धरिले महादेव कैलासी नेले
शेवटी पार्वतीने शंकरास कैसे फसविले होऊनी भिल्लीणी
मशी बोल भिल्लीणी सदाशिव म्हणे
N/A
References :
संग्राहक: श्री. रमजानखान महंमदखान
Last Updated : October 17, 2012
TOP