कुलदैवत - नमन
मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
आधी नमन करु चिंचवडीच्या मोरया
रत्नजडित तुळया मंडपात
आधी नमन करु चिंचवडीच्या मोरया
रत्नजडित समया तेवतात
आधी नमन करु आळवाचं पान
नाव गजानन मोरयाचं
आधी नमन करु आळवाची देठी
नाव जगजेठी मोरयाचं
आधी नमन करु आळवाची देठी
गणपतीपुढं मोठी सरस्वती
आधी नमन करु आळवाचं पान
गणपतीपुढं ध्यान सरस्वती
आधी नमन करु नमनाचं झालं पाणी
नाव चिंतामणी मोरयाचं
N/A
References :
संग्राहिका: सौ. सरस्वतीबाई गोखले
Last Updated : October 17, 2012
TOP