कुलदैवत - आरती
मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
आरती केली तुझ्याच नावाची
शंभू महादेवा चवर्या बाबाची
आरती केली आरतीत काप
ओवाळीला जातो गिरजाबाईचा बाप
आरती केली आरतीत काय
ओवाळीली जाते गिरजाबाईची माय
आरती केली आरतीत दाणे
ओवाळीले जाते गिरजाबाईचे घराणे
आरती केली आरतीत गहू
ओवाळीले जाती गिरजाबाई तुझे भाऊ
आरती केली तुझ्याच नावाची
चवर्या बाबाची शंभू महादेवा गा
N/A
References :
संग्राहक: श्री. भगवंत ठाकरे
Last Updated : October 17, 2012
TOP