कुलदैवत - आरती
मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
आरती केली तुझ्या नावाची
शंभूदेवा तूझ्याच नावाची
आरती केली आरतीत काय
ओवाळिली देवा गिरजाची माय
आरती केली आरतीत मोत्यांचे काप
ओवाळिला देवा गिरजाचा बाप
आरती केली आरतीत सांबशिव
गिरजाचा पती शंभू महादेव
महादेवा गाते झुळूझुळू गंगा
तिथं उभी राहे पारबती रंभा
N/A
References :
संग्राहिका: सौ. कुमुदिनी पवार
Last Updated : October 17, 2012
TOP