कुलदैवत - घाणा
मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.
घाणा भरियेला विडा ठेवियेला
आदि नमियेला गणराज
घाणा भरियेला साचा खंडेश्वरी मातेचा
मोठा भार तो गोताचा गणराज
आम्हा घरी कारणी गणराज पुराणी
मांडव दणाणी चारी दिवस
आम्हा घरी तुम्ही देवे गणराजे यावे
मांडवी राहावे पाच दिवस
गणराज गणपती त्याशी शेंदुरे लिंपिती
जे मनी कल्पीती तेची होय
आदि मूळ धाडी घुंगुरांची गाडी
शालजोडीचा वर्हाडी गणराज
आदि मूळ धाडा अंबेचे हो गावा
मग तेल लावा कृष्णनाथा
पानाचा की पुडा फुलाचा हो तुरा
आदि मोरेश्वरा नमियेला
आदि मूळ धाडा दूरीचीये हो दूरी
आम्हा कुळाचारी अंबेश्वरीमाय
N/A
References :
संग्राहिका: सौ. कुमुदिनी पवार
Last Updated : October 17, 2012
TOP