कुलदैवत - महादेव

मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.


प्रथम शंकराच्या देवळात उंबरठ्याजवळ गेल्यावर...
देखिली शिवाची पायरी
पाप गेले बाहेरी
देखिला शिवाचा उंबरा
पाप गेले डोंगरा
देखिलं शिवाचं अंगण
घेतीलं पापानं रिंगण
देखिला शिवाचा कळस
झाला पापाचा आळस
नंदीला पूजते वेळी...
नंदी नंदी नंदुकलं
वंदीन तुझं आंदुकलं
थापटीन तुझी पाठ
तीर्थ घडली तीनशे साठ
नंदीच्या गळ्यात सोन्याचं दावं
नंदीला घेऊन काशीला जावं
नंदी तूं जा कैलासाशी
माझा नमस्कार शंकराशी

N/A

References :
संग्राहक: श्री. ब. गं. चौधरी

Last Updated : October 17, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP