मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|पंचक| अलिप्तपंचक पंचक भक्तिपर अभंगपंचक कलियुगपंचक मूर्खपणपंचक भ्रांतिपंचक अभिभानपंचक उन्मत्तपंचक आळसपंचक बंधनपंचक पराधीनपंचक मलिनपंचक प्रस्ताविकपंचक वेडसरपंचक क्षोभपंचक वोसणपंचक विवेकपंचक वैराग्यपंचक संशयपंचक नीतिपंचक उपासनापंचक भक्तिपंचक कथापंचक निष्ठापंचक शिकवणपंचक निश्चयपंचक अलिप्तपंचक ज्ञानपंचक ध्यानपंचक सख्यपंचक संवादपंचक अर्थसार्थपंचक सुंदरपंचक व्यर्थपंचक होळीपंचक वादपंचक भ्रमपंचक झटपणीपंचक गंधपंचक संतपंचक स्फुट पंचक - अलिप्तपंचक समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : ramdassamarthaरामदाससमर्थ अलिप्तपंचक Translation - भाषांतर ॥१॥सृष्टी दृष्टीसी नाणावी ।आत्मप्रचित जाणावी ॥१॥दृष्यविरहित देखणें ।ड्रुष्य मुरे दृष्यपणें ॥२॥सृष्टी वेगळा निवांत ।देव भक्तांचा एकांत ॥३॥राम अनुभवासि आला ।दासविवाद खुंटला ॥४॥॥२॥मायेभोवतें भोवावें ।तरि तिनें कुरवाळावें ॥१॥संत एकटा एकला ।एकपणाही मुकला ॥२॥त्यासि माया असोनि नाहीं ।आपपर नेणें कांहीं ॥३॥रामीं रामदास गाय ।व्यालीं नाहीं चाटिल काय ॥४॥॥३॥होता वृक्षाच्या डहाळीं ।पक्षी गेला अंतराळीं ॥१॥तैसा माया वोलंडिली ।वृत्ती स्वरूपीं राहिली ॥२॥खेळकर सूत्र सोडी ।गेली आकाशी वावडी ॥३॥भूमंडळीं होता आला ।ढीग आकाशी उडाला ॥४॥केलें सिद्धीचें साधना ।पाय वेधला गगना ॥५॥रामीं रामदास म्हणें ।पहे दृष्टीं तारांगणे ॥६॥॥४॥दृश्य सांडूनियां मागें ।वृत्ति गेली लागवेगें ॥१॥माया सांडूनि चंचळ ।झाला स्वरूपीं निश्चळ ॥२॥कांहीं भासची नाढळे ।वृत्ति निर्गुणीं निवळे ॥३॥चराचर तें सांडिलें ।बहुविध वोलंडिलें ॥४॥अवघें एकचि निर्गुण ।पाहे वृत्तीतें आपण ॥५॥रामदास सांगे खूण ।वृत्ति चातुर्यलक्षण ॥६॥॥ अभंगसंख्या ॥२०॥ N/A References : N/A Last Updated : March 30, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP