मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|पंचक| होळीपंचक पंचक भक्तिपर अभंगपंचक कलियुगपंचक मूर्खपणपंचक भ्रांतिपंचक अभिभानपंचक उन्मत्तपंचक आळसपंचक बंधनपंचक पराधीनपंचक मलिनपंचक प्रस्ताविकपंचक वेडसरपंचक क्षोभपंचक वोसणपंचक विवेकपंचक वैराग्यपंचक संशयपंचक नीतिपंचक उपासनापंचक भक्तिपंचक कथापंचक निष्ठापंचक शिकवणपंचक निश्चयपंचक अलिप्तपंचक ज्ञानपंचक ध्यानपंचक सख्यपंचक संवादपंचक अर्थसार्थपंचक सुंदरपंचक व्यर्थपंचक होळीपंचक वादपंचक भ्रमपंचक झटपणीपंचक गंधपंचक संतपंचक स्फुट पंचक - होळीपंचक समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : ramdassamarthaरामदाससमर्थ होळीपंचक Translation - भाषांतर ॥१॥ अवघेचि बोंबलती ।होळीभोंवतें भोंवतीं ॥१॥माया होळी प्रज्जवळली ।सृष्टि वेढारें लविली ॥२॥ज्याकारणें गुंडाळती ।तेंचि वाचें उच्चारिती ॥३॥होळीमध्यें खोजें आहे ।तें तूं विचारूनि पाहे ॥४॥खाजें खातां सुख होये ।परी कठीण हाता नये ॥५॥खोल दृष्टीनें पाहिलें ।खाजें त्याच्या हाता आलें ॥६॥एक उडी घालूं जाती ।लंडी चुकोनी पडती ॥७॥एक देहाचे पांगले ।तेचि आगीं हुर्पळले ॥८॥उडी अवध्यांचीच पडे ।परि तें हातास न चढे ॥९॥एकें थोर धीर केला ।खाजें घेऊनि पळाला ॥१०॥एक आपणची खाती ।एक सकळांतें वाटिती ॥११॥एक घेउनी पळाले ।तंव त्यावरि पडे जाळें ॥१२॥रामीं रामदास होळी ।केली संसाराची धुळी ॥१३॥॥२॥ अझुनी कायरे दुश्चिता ।सावधान होईं आतां ॥१॥नागविलें योनिद्वारें ।म्हणूनि बोंबलती पोरें ॥२॥सकळ नाडीयेलें वोजें ।अवघी एक बोंब गाजे ॥३॥धुळी टाकिली मस्तकीं ।कोणी दाद देईना कीं ॥४॥राडी ऐसे नर्क होती ।म्हणोनि प्रत्यक्ष दाविती ॥५॥झोबी लोंबी हो घेउनी ।जाती टाकिती नेउनी ॥६॥नेघे नेघे म्हणती बळी ।बळें घालिती पाताळीं ॥७॥धरुनी अकस्मात नेती ।अवघीं कौतुकें पहाती ॥८॥तेथें असेना मर्यादा ।थोर करिती आपदा ॥९॥घरोघरीं फेरे करिती ।तैशा होती पुनरावृत्ति ॥१०॥॥ अभंगसंख्या ॥२३॥ N/A References : N/A Last Updated : March 31, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP