रघुवीरराव रचित पदे
अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते.
श्रीरामनाम नवमौक्तिकमालभारी ग्रीव: सदाचरणवर्तनसक्तचित्त: ॥
वारणसीजठरखन्यविगीतरन्तं विद्वद्वरो विजयते मम देशिकेश: ॥१॥
बोधलाभजनरंजनो जनिप्रेमगीतरसिक: कवीश्वर: ॥
ब्रम्हापद्धतिसुतोषभागयं विठ्ठल: स इति को न संवदेत् ॥२॥
॥ अण्णावर स्तोत्र ॥
श्रीमद्रुरूला त्द्द्दयीं धरूनी । अत्यद्भुत प्रेम त्द्ददीं धरूनी ॥
बुद्धिप्रकाशार्थ सदा लऊनी । वर्णूं तयातें चरणी नमूनी ॥१॥
टिळे द्वादश स्पष्ट मुद्रा विराजे । गळा मालिका कुंडलें कानि साजे ॥
मुखीं रामनामें जपेमाळ हातीं । स्मरो विठ्ठलाख्या गुरू भव्यमूर्ती ॥२॥
शिरोवेष्टना बांधिजे साधु बाणे । परीधान वस्त्रें धरी शुभ्र वाणे ॥
असे गौरकांती करी घ्यान चित्तीं । स्मरो विठ्ठलाख्या गुरू भव्यमूर्ती ॥३॥
उदासीनवृत्ती प्रपंचीं सुखानें । वदे शास्त्रवेदांतचर्चा मुखानें ॥
मनानें वरी सर्वदा शुद्ध शांती । स्मरो विठ्ठ० ॥४॥
सदाचार साहये करी धर्मनिष्ठा । धरूनी वरी जो समाधी प्रतिष्ठा ॥
प्रभु व्यक्तिमाजी करी रामभक्ति । स्मरो विठ्ठला० ॥५॥
हरि सांठवीला त्द्ददाकाशसद्मा । नमस्कार माझा तया पादपद्मा ॥
सुटायास हे संसृती घोर प्राप्ती । स्मरो विठ्ठला० ॥६॥
पदांकें हि साजे समाधी जयाची । जिच्या पूजनें जाय बाधा भवाची ॥
प्रती चित्रलीपी सहायें असे ती । स्मरो विठ्ठला० ॥७॥
गुरुस्तोत्रमिदं नित्यं य: पठेद्भक्तिसंयुत: ॥
सएव प्रीतिपात्र: स्याद्रामस्य परमात्मन: ॥८॥ (इति संपूर्ण)
पद (चाल - नमो एकनाथपंतसंतसाधुभला, राग कालंगडा)
विठ्ठलपंत संत साधुभजू या भवीं आम्हीं ॥धृ०॥
कर्हाडांत वस्ति करुनि बिर्हाडास आलों म्हणुनि घबाड हाचि देह गणुनि जाणुनि रघुनाथ नमीं ॥वि०॥१॥
बेंद्रे उपनाम धरुनि हेंद्रे जन उद्धरोनि केंद्रेचा सूर्य जसा गृहामाजि भक्तजनीं ॥विठ्ठ०॥२॥
खंडन विधवाविवाह मंडन करी धर्म महा । दंड करी पंडितासि । भंड म्हणुनि त्याग करी ॥विठ्ठ०॥३॥
हेतु रामचरित करुनि । सेतु हाचि भावि मनीं । याचि पथें जावें म्हणुनि कृष्णातें बोध करी ॥विठ्ठ०॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : January 07, 2015
TOP