कौसल्या
अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते.
पद - ताल, राग व चाल सदर.
देवा रूप अलौकिक हें प्रगट नसो ॥धृ०॥
बा हें रूप तुझें श्रुतिगेय ॥ जें कां योगिजनाचें ध्येय ॥
शुद्ध वेदांताचें मेय ॥ मूर्त श्रेय भक्तांचें ॥१॥
स्मरतां अनादि दु:ख जाय ॥ होतें चित्त चिन्मय प्राय ॥
ते हे आज देंखिले पाय ॥ हें किती काय भाग्य वदूं ॥२॥
बा मज केलें आजि कृतार्थ ॥ आतां हें रूप वसो चित्तांत ॥
शिशुसें व्हावें या सदनांत ॥ हेंचि मनांत फार असें ॥३॥
बोंबडे बोल तुझेबा गोड ॥ ऐकिन हेच माझी खोड ॥
करितां तुझें कौतुक कोड ॥ होइन सोड संसारीं ॥४॥
पायां नमित्यें मी तव तूर्ण ॥ छाया करा कृपेची पूर्ण ॥
माया तव नको घूर्ण ॥ हे परीपूर्ण विश्वगुरो ॥५॥
पद - राग जोगी (माझा कृष्ण देखिला.)
धन्य धन्य धन्य ती, माय कौसल्या ॥धृ०॥
प्रेमें बोले वरद धुरीण ॥ आई मजविषयीं बहुशीण ॥
केलें जन्मांतरिं तें रीण ॥ येणेवीण फेडूं कसें ॥ धन्य० ॥१॥
केले जरिकां. नानाव्याप ॥ तरि हें मद्दर्शन दुप्प्राप ॥
एक मद्भक्तचि ते निष्पाप ॥ पाहुनि ताप विस्मरती ॥ धन्य० ॥२॥
मजविण नरुचे अन्य़ जयांस ॥ ऐसे माझे विशुद्धदास ॥
त्यांची पुरवितसें मी आस ॥ हें तो खास व्रत माझें ॥ धन्य० ॥३॥
ऐसें बोलूनियां सुरमणी ॥ झाला शिशुसा हो तत्क्षणीं ॥
विट्टलपंत कवीचा धणी ॥ मंदस्वनी रडूं लागे ॥ धन्य० ॥४॥
विश्वामित्रानें स्वयज्ञ संरक्षणार्थ रामलक्ष्मणास मागितलें असता ते अल्पवयी म्हणून देण्यास अयोग्य असें दशरथ विशामित्रास सांगतो.
पद - व्यर्थ आम्ही अबला या चालीवर.
राम केवळ लहान, स्वामी द्यावें कसें हो दान ॥धृ०॥
स्वामि जया अद्यापि धनुष्या ॥ लाऊं न कळे बाण ॥ स्वामी० ॥१॥
राक्षसलक्ष मुलेंही कैसें ॥ होईल यज्ञ त्राण ॥ स्व० ॥२॥
काय वदूं हा राम बहिश्वर ॥ या वृद्धाचा प्राण ॥ स्वा० ॥३॥
संतत ज्याचें पंतविठ्ठला ॥ सहज लागलें ध्यान ॥ स्वा० ॥४॥
Last Updated : January 10, 2015
TOP