पश्चात्तापपर पद
अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते.
पद - पश्चात्तापपर (संस्कृत.)
आरती चालीवर
हरहर किं कृतमेतच्छिव शिव धिग् मां ॥
ईद्दगहं मंदमति: पापात्मा विमतो ॥
जननी दुर्जठरात्खलु नैव कथं गलितो ॥ हर० ॥१॥
श्रीकौसल्या सीता कृतकोपानलतो ॥
दग्ध:सन्नहमथवा कथमिव नैव मृतो ॥ हर० ॥२॥
अपराधिनमपराधिनमपराधिनमेनं ॥
मामव रामस्वामिन् सदय हृदय दीनं ॥ हर० ॥३॥
स श्री भरतो त्द्दत्वाऽखिलविषयासक्तिं ॥
वितरतु विठ्ठलपंतं प्रति रघुपतिभक्तिं ॥ हरहर० ॥४॥
पद - (तस्करां हातीं) या चालीवर.
राघवा तुझा तुझा लागो छंद ॥ न जडो दुर्मतिचा गंध ॥ रा० ॥धृ०॥
न रुचो विषय विषय विषावाणी ॥ आवडो संतांचीं वाणी ॥१॥
अंगिं रोमांच रोमांच नयनपाणी ॥ झरपो तुझिं गातां गाणीं ॥ रा० ॥२॥
विठ्ठलपंतासी पंतासि हेंचि काम ॥ आवडो सदा तुझें नाम ॥ रा० ॥३॥
Last Updated : January 09, 2015
TOP