मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीविठोबाअण्णाकृत पदे|
सुभद्राहरण

सुभद्राहरण

अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते.


अर्जुन सुभद्रेसाठीं  कृष्णाच्या आग्रहानें त्रिदंडसन्यासवेष स्वीकारून चातुर्मास रहाण्याच्या निमित्तानें द्वारकेंत जातो. तो थाट कवि वर्णितात.

( पद - (गडयांनो घ्या हरिच्या० या चालीवर.)

अर्जुन होउनि सन्यासी ॥ झाला द्वारावतिवासी ॥धृ०॥
बरवा परिकर लंगोटी ॥ गुलाबी खडखडीत छाटी ॥
प्रणवोच्चार स्थिति होटी ॥  स्मरणी चालतसे बोटीं ॥
अंगीं विभूतिची ऊटी ॥ पटीवेष कांति मोठी ॥
पाहुनि जन भुलले त्यासी ॥ झाला द्वारावति वासी ॥१॥
लोटली द्वारावति सारी ॥ झाली खेट मठद्वारीं ॥
पुजाया ना उपचारीं ॥ वेळा साधिताति चारी ॥
दुर्लभ यतिदर्शनभारी ॥ ढोंग माजविता कंसारी ॥
पडल्या भेटीच्या राशी ॥ झाला० ॥२॥
यतिची सतत मौनवृत्ती ॥ समाधिस्थिति बहु एकांतीं ॥
वेदांतस्थ रहस्योक्ती ॥ बोलतां फार सरस युक्ती ॥
त्यांतुनि तीव्रतर विरक्ती ॥ उपजली सर्व जना भक्ती ॥
येऊनि बसति तयापाशीं ॥ झाला० ॥३॥
वर वर वर वियोग मुद्रा ॥ गड बडतसे मनिं सुभद्रा ॥
भरतें येत स्मरसमुद्रा ॥ रात्रंदिवस नये निद्रा ॥
हें एक ठावें यादवेंद्रा ॥ उपजवी प्रीती बलभद्रा ॥
कुतूहल पंतविठ्ठलासी ॥ झाला द्वारावति वासी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP