अहिल्योद्धार
अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते.
अबला मी बा तुझें जाणों तत्व कैसें काय ॥ यास्तव बा राघवा नमितें शतधा तुझे पाय ॥ अब० ॥धृ०॥
बा श्रीरामा पाहुनियां तव पद पद्माची धूल ॥ गंगाकरिते सकल जनाचें निखिल पाप निर्मूल ॥ आजमजवरि तत्प्रसाद हें तो कैवल्याचें मूळ ॥ काय मी वर्णूं रामा आपुलें जन्मांतरिचें भाग्य ॥ अब० ॥१॥
सत्यज्ञानानंत अवाङमनसा गोचर जगदाद्य ॥ स्वरूप चिन्मय जे कां केवळ आत्मानुभवास्वाद्य ॥
दाखविलें तें मजला डोळां वेदशिर: प्रतिपाद्य ॥ काय मी होऊं तुजला जन्मोजन्मीं उतराया ॥ अब० ॥२॥
आतां करुणासिंधो माझी परिसावी विनती ॥ अमृतकटाक्षें तुझिया सर्वहि आजि निमाल्या वृत्ती ॥
मेघश्यामल हें तव कोमल रूप वसो मच्चित्तीं ॥ दे तव भक्तिच रामा जे कां साधुजनाची माय ॥ अब० ॥३॥
नमो नमस्ते रघुकुल तिलका भूषित भास्करवंशा ॥ नमो नमस्ते पुराण पुरुषा मुनिजनमानसहंसा ॥
नमो नमस्ते सच्चिद्रूपा भुवनत्रितयोत्तंसा ॥ ऐसें स्तवुनी साध्वी गेली; स्तवितो विठ्ठल राय ॥
Last Updated : January 10, 2015
TOP