कंजनयन गोपाल भज भज भज सर्वकाल ॥ कंज० ॥धृ०॥
पच्छोच्छलितावतंस गुंजगुच्छ विलसदंस पिच्छिलतापिच्छकंस, कंसासुर गिलन काल ॥ कंज० ॥१॥
हल्लकनव पल्लवपद मंदस्मित फुल्लगल्ल बल्लव कुलवल्लभ जो मल्लमदन सुभगभाल ॥ कंज० ॥२॥
हट्ट त्यज धैर्य धरीं धट्ट संतपाय घरीं ॥ चट्ट दुरित गट्ट करिल पंतविठ्ठलाऽधिपाल ॥ कंजनयन० ॥३॥
पद - राग, ताल, चाल सदर.
कमलनयन गोपाल भजभज भज सर्वकाल ॥ अघ बक खग कंसकाल प्रणतपाल बहु दयाल ॥ कम० ॥धृ०॥
कंबुकुंठ इंदुवदन, कुंदकुड्मलाग्ररदन ॥ कांतिविजित कोटिमदन, सगुणसदन कुटिलबाल ॥ कम० ॥१॥
पुंडरीक - दलविशाल - नयनयुगुल रुचिरभाल वन्याप्रपदीनमाल दमितव्याल ब्रजपबाल ॥ कम० ॥२॥
चंद्रवंश जलघिहीर परिहित सौवर्णचीर ॥ विठ्ठलकवि मीननीर, समरधीर विजयशाल ॥ कम० ॥३॥
पद - राग केदार, ताल दिंदीचा.
रामराजाधिराज ॥ भज सांडुनिया लाज ॥धृ०॥
करधृतशरधनु, संचरितो भक्ता अनु ॥ नवजलदश्यामतनु ॥
साधितोस दास काज ॥ राम० ॥१॥
दीननाथ दीनबंधु तोडि भक्त भवबंधु विठ्ठलासि कृपासिंधु ॥
जे चालवितो विराज ॥ राम० ॥२॥
पद - राग भूपकल्याण, ताल दिंडीचा.
भज रघुवीरं समरसुधीरं ॥ भज० ॥धृ०॥
सद्नुणसदनं हिमकरवदनं ॥ कांचनमयकोटीरं ॥ भज० ॥१॥
करधृतचापं परिहृततापं ॥ नवघनरुचिर शरीरं ॥ भज० ॥२॥
दशरथतनयं प्रकटित विनयं ॥ विठ्ठलपालनधीरं ॥ भज० ॥३॥
पद - राग कल्याण, ताल त्रिवट.
अरे मानवा भज राघवा किति वैभवा भुलसी नवा ॥ अरे० ॥धृ०॥
त्यजुनी मदा भजतां पदा हरि आपदा नहि वानवा ॥ अरे० ॥१॥
बहु पाहिलें रस गाइले जरि सेविले तरि हा नवा ॥ अरे० ॥२॥
प्रभु विठ्ठला शरणा चला कुरु मारिला भवदानवा ॥ अरे० ॥३॥
पद - राग कल्याण, ताल दिंडीचा.
त्यजुनि कामधाम सदा गाई श्यामधामराम ॥धृ०॥
धाम येतसे निकाम (काम करुनि अष्टजाम) ॥
किति करिसिल दामदाम दामदाम ॥ त्यजु० ॥१॥
आत्मग्रामचा मुकाम काम करुनि हो विराम ॥
भोगि राम नाम हा इनाम नाम नाम नाम ॥ त्यजु० ॥२॥
संतगीत कथानंत राम श्रीमंत कृपावंत पंत ॥
विठ्ठलाभिराम राम राम राम राम ॥ त्यजु० ॥३॥
पद - राग कल्याण अथवा झिंझोटी ताल दिंडी.
(भजभज जलधिमाजी या चालीवर)
परमधाम जलदश्याम रामसखा गायरे ॥धृ०॥
ध्यानभजन यजन करूनि, भगवज्जनसंग धरुनि ॥
वरुनि शांति विगलितमनिं, विष्णुपदीं त्वरित जायरे ॥ पर० ॥१॥
निर्गुणपदिं नित्यसक्त, शुकसनक प्रभृतिमुक्त, निरतिशय प्रेमयुक्त, भजति वंद्यपायरे, ॥ पर० ॥२॥
अजगजहयमहषिगाय, तनयस्त्रीविविधदाय केवल ही जळतखाय पडुनि यांत करिसि हायरे ॥ पर० ॥३॥
कवि विठ्ठलराय म्हणे निर्मद निर्यामपणें संम्मत - अनपाय हाचि ॥ भवतरणा शुभउपायरे ॥ पर० ॥४॥
पद - पंचचामराची चाल.
सीतावरं गुणसागरं भज सादरं अनुवासरं ॥धृ०॥
कनकांबरं रविभास्करं दमितासुरं करुणाकरं ॥१॥
विमलांतरं भृतवानंर स्मृतसुंदरं श्रितमंदरं ॥
कविविठ्ठलं प्रतिनिर्भरं करुणाकरं परत: परं ॥२॥
पद - राग आडाना तिताल.
(जोडिन हरिसहवास या चालीवर.)
स्मर सखया हरिच्या पायां ॥ किति उगाच फिरसिल वांया ॥धृ०॥
दैविदुरत्यय गुणमय माया नान्य उपाय तराया ॥ स्म० ॥१॥
यत्नजपाया करिसिउपाय किति चिंतिसि सुतजाया ॥ स्म० ॥२॥
काल सदोदित ही तव काया ॥ टपला गट्टं कराया ॥ स्वम० ॥३॥
हाचि सुगम पंथ भव उतराया ॥ गमला विठ्ठल राया ॥ स्वम० ॥४॥
पद - राग आडाना, ताल दिंडीचा.
(हरिचें नामगा या चालीवर)
करिं अतित्वरा ॥ घडि घडि घडि पल पल जप. अमृतधाम राम नाम, धरुनि आदरा ॥ करि० ॥धृ०॥
अंत समय परम घोर, दोषत्रय करिति जोर, घुरु घुरु घुरु कंठ होय, भरिल भ्रम हरिल स्मृति, करिल होसि घाबरा ॥ करि० ॥१॥
अति दुर्धर अपरि हरा, येइल जंव तुजसि जरा, लट लट लट हालेल मान, धनुसमान तनु पुमान्, होत बावरा ॥ करि० ॥२॥
जो इंद्रियसंघ दक्ष, तो निजकल्याण दक्ष, त्यज वटवट खटपट उगि ॥ झटपट करिं कपट रहित. भज रमावरा ॥ करि अति त्वरा ॥३॥
पद - संस्कृत राग - सोरट दीपचंदी
भज भज मनुजा श्री गोपालं ॥धृ०॥
मृगमदचंदन चर्चित भालं ॥ धूसरितालक जालं ॥ भज० ॥१॥
कुंडल मंडित चारुकपोलं ॥ कर्षित राधाचोलं ॥ भज० ॥२॥
दुर्धर दुर्मद कालिय कालं ॥ विठ्ठल पालन शीलं ॥ भज० ॥३॥
पद - संस्कृत (राग ताल व चाल सदर)
भज भज मनुजा श्री रघुवीरं ॥धृ०॥
रावणराक्षसनाशगभीरं ॥ रविवंशांकुर हीरं ॥ भ० ॥१॥
मुनिजनमानस - पंजरकीरं ॥ नीरदसुभगशरीरं ॥ भ० ॥२॥
पंचवटीतटविहितकुटीरं ॥ विठ्ठलमीनसुनीरं ॥ भज० ॥३॥
पद - राग खमाज त्रिताल.
(सबधटमो रामजागे या चालीवर.)
भज मनुजा रामचंद्रा, भज मनुजा रामचंद्रा ॥धृ०॥
सुख मानुनि संसारीं, सुखशय्येमाजिं नारी, विषयाची प्रीति भारी ॥
किति करिसि गाढ निद्रा ॥ भज० ॥१॥
क्षणभंगुर संपत्ति, घडे अंतीं ते विपत्ति, किती हत्ती घोडे पत्ती ॥
क्षय आहे इंद्रचंद्रा ॥ भज० ॥२॥
कविपंत विठ्ठलनाम, गुणग्राम पूर्णकाम, भजतो कीं सौख्यधाम ॥
टाकुनियां सर्व तंद्रा ॥ भज० ॥३॥
पद - राग कलंगदा त्रिताल.
स्मर मानव हरिच्या पायां किती उगाची शिणशील वांया ॥धृ०॥
गुणमय दुर्धर व्यापुनि भरली ॥ दुस्तर श्रीहरिमाया रे ॥१॥
यत्न जपाया करिशी रुपाया ॥ चिंतसि किति सुतजाया रे ॥२॥
स्वपदीं जाया दु:ख हराया ॥ विठ्ठल विभुगुण गाया रे ॥३॥