माझा महाराष्ट्र - महाराष्ट्र जय महाराष्ट्र ...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


महाराष्ट्र जय महाराष्ट्र हा निनाद अंबर भरी,
महाराष्ट्र - यश दिव्य गाइलें अनंत लोकेश्वरीम’
थोर थोर नरवीर धैर्यधर संत - सन्मणी गुणी
तुझ्याच चरणीं लीन जाहले माय विश्वपावनी !
==
मानवतेची शुद्ध बंधुता एक भरी चित्तीं
आत्मानंदी एकरूपता स्वर्भूला देती;
ऋषीश्वरांचें पुण्य धाम हें भूमंडळ केलें.
यक्षदेवगंधर्व आणिले तोंच तिनें खालें.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP