होता दुर्बल एक जीव - होता दुर्बल एक् जीव अगदीं...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
होता दुर्बल एक जीव अगदीं मातींतला केवळ,
कष्टें कष्टत बापुडा निशिदिनीं त्या हेहभारा धरी;
कोणेका दिवशीं विचित्रचि तया निद्रा करी व्याकुळ
देहाची मग शुद्धबुद्धहि पहा नाहीं तया राहिली.
मृत्यू येऊनि घोर घर्घर करी दारीं तयाच्या परी,
होता तो धरणें धरूनि बसला दारीं कुणाच्या तरी.
ते कोणी परि कोण ? आणि धरणें हें तों कशावें कसें ?
त्याचें त्यास न ठाउकें मग अहा अन्या कळावें कसें ?
झालें तें धरणें प्रसादन म्हणा, निद्राहि वा ती पुरी;
देहाच्या जड बंधनांतुनि सुटे तो जी (व) अत्यदभुत
ही वासंतिक सृष्टि पुष्पहृदयीं आताम तयाला धरी
तोही मंद सुगंध घेत विचरे सानंद विश्वांतरीं.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP