तापल्या जिवाला कोण देइना ताप ? - मम विशीर्ण गीता ! पाठवुं ...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
मम विशीर्ण गीता ! पाठवुं तुज जगतांत ?
कां ठेवुं आपुल्या सांठवुनीच मनांत ?
ती जीवकला नच सुंदर तुजवर कांही,
तुज चित्ताकर्षक गंधहि उरला नाहीं.
जो लाजवील कीं ललनेच्या हदयाला
तो रंग नसे तव दैवीं लिहिला बाळा !
तव भग्न देहिं मधुबिंदूही नच राही
करिशील काय तरि राहुन जगतीं पाही.
ही तीव्र झळात्या उन्हावरुनिया आली
परि करूं नको ती मान (?) लाडक्या, खाली.
जणुं जाल तापल्या दगडांतुनि निघतात,
जळलेंस परी नच पुरें जाहलें त्यांत.
तापल्या जिवाला कोण देइना ताप ?
संतप्त नरावर कोण करि न संताप ?
वेडयाच्या मागें होऊनि वेडें लागे,
तूं दु:खी जन, तव दु:खचि राहिल मागें
(अपूर्ण)
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP