ग्रंथारंभीं नमन देवते श्री मानवते तुला
दिव्य देवता विविध - रूपिणी तूंच एक निस्तुला.
==
गंधोद्दाम जसें प्रसून भरुनी सौगंध वार्यावरी
प्रेमोद्दाम कवी तसाच पसरी रामण्य विश्वांतरीं ॥
==
सृष्टि मला हांसविते । स्वर्ग - सोख्य दाखविते,
शांतीने पालविते. आनंदें डोलविते,
मन माझें टाकि गडे नित्य गुंगुनी.
==
प्रसन्न गंभीर जलाशयावरी,
विलासिनी सुंदर नाव सांवरी,
हळूं हळूं चांद्र - पथांत पावली
क्षणैक सौंदर्यकला विसांवली,
==
सांध्यछाया सुकुमार काजळून । विश्व झालें निस्तेज उदासीन
गेहिं गेहीं गृहदीप जळूं लागे । सौख्य - शांती - सौभाग्य तयासंगें.
दाट माझा अंधार सरत नाहीं । ओस पुढतीं ब्रम्हाड ऊभें राही
कुठें जाऊं ? घरदार कुठें माझें । कशी साहूं हुरहूर मनीं दाटे,
प्रेम नाहीं. क्षण सौख्य जिवा नाहीं । शांति नाहीं मन पळ न अचल राही.
==
पुन:पुन्हा हुरहुरुनि जीव का आज गडे येई ?
मधुर तार झंकार काढिते कां हृद्य़ीं बाई ?
अभागिनी दुर्दैव तुझें ग तुटली ना तार,
भग्न वाद्य हें खुळें प्रीतिचें कसें वाजणार ?
दिव्य पूरूषा सांग कधीं का येइल तो काळ,
बुडुनि विश्व कधिं सुधासमुद्रीं जाइल अळुमाळ.
द्दष्टिमधुनि या झरेल जेव्हां दिव्य सुधाधार
धरावया हा कटाक्ष माझा पुरा हृदय - चोर !
==
मधुमंगल गायन गाते सांध्य - देवता कोणातें
झोंप अझुनिही जगताला, शांतपणा भुवनीं भरला.
मंदचंद्रिका विरल दिसे, गोड सुखाचें स्मरण जसें,
सौभ्याग्याचा दीप जसा शुक्र येतसे नभीं तसा;
मंगल मंगल हें अवनीतल, मारू शीतल,
गगनाच्या हृदयावरती मंद अचल निजले असती.
मोहन पिवळ्या रंगाचें मंदपणें गगनीं नाचे,
माळेपरि गुंफियली ती नील वनश्री मजभंवती,
त्यामधुनी सुंदर गंध स्वप्नापरि विचरे मंद,
मोहन पिवळ्या रंगाचें अरुणाचें गगनीं नाचे
मंद चांदणें त्यांत दिसे, विरघळलेलें स्वप्न जसें;
मधुनयनीं जातां जातां वळुनि बघे रजनीमाता
तीच नीलिमा आळसली, आलिंगुनि भुवनीं बसली;
मालेपरि वेष्टित झाली उपवन शोभा भंवताली;
तींत गुंफिले गंध किती, ठायींच्या ठायीं झुलती;
चित्रापरि मंगलताही प्रतिबिंबित हृदयीं होई;
हृन्मांगल्या मग देई मंगलता अभिनव देई -
हृन्मोहक मंगलताही शांति भरे निस्तुल देहीं
मी माझेपणा आळसवीं, स्वप्नापरि वसुधा बसवी.
==
अनंत दिव्यकणी । पसरोनी । अनंतत्व दे गगनीं
फुंकारें आधीं । दूर करी । रविप्रभाही सारी
मग ला - ला - गाणीं । गावोनी । बाहयजगा निजवोनी
कर अंधाराचा । पाऊस । पाहुनि शांत जगास,
ते सगळे नाद । नि:पात । बुदवुनि सप्त तळांत
राज्य करी जगतीं । घेऊन ती । शांतिपताका झातीं.
आतुर गे डोळे । बघण्याला । रूप तुझें अवलीळा.
व्योमीं लाल फुटे । तोच करी । हाकाटी तुजसाठीं,
तुजविण कोण बरें । वारील । बाहय जडाचा खेळ ?
तुजवांचुनि कोण । पेरविल । हृदयीं प्रेम विलोल ?
बाहिल कोणाला । तुझ्याविणें । चित्तहि उल्हासानें
लाल । पाहोनी । रक्तपताका गगनीं
फोडी हंबरडा । ही अवनी । दु:खित काव्यमुखांनी
जागा मी झालों । आईच्या । त्या प्रेमळ रजानीच्या
(अपूर्ण)
==
रात्र किर्र ही तिडतिडताहे, दीप सन्निधानीं;
ऋषीश्वरांच्या पंक्ति बैसल्या यज्ञधूम्र गगनीं;
पावित्र्य भरी मंगल तेथें शुभवातावरणीं
सुर, किन्नर, गंधर्वदेवता येऊनि भूवरती.
पुण्यस्पर्शे आशीर्वादि वस्तुजात करिती
गोड दुधानें गायि दाटल्या हंबरती मागें
शेतें पिकुनी पीक नाचरें वार्यावर रांगे.
फुलाफुलांनीं रान दाटलें, ओढे त्यामधुनी
धावति येऊनि पाट जळांचे हिरव्या राईंत
मंजुळ गाणीं गात पांखरें वरतीं उडतात
फूलपांखरें हिरव्या कुरणामधिं बागडतात
सान थोर हो प्रसन्न सगळें विश्व दिसे झालें
(कच्चे आणि अपूर्ण)