विश्वर्दर्शन - विश्वर्दर्शनीं जीव उचमलें...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


विश्वर्दर्शनीं जीव उचमलें मन थयथय नाचे
बंध - बंध हो शिथिल - हरपतें भानच देहाचें,
जीव ओढितो वरवर जाया चैतन्यापाठीं
जडदेहाची सुटे - तुटेना द्दढ बसली गाठी.
परमानंदीं म्हनुनि उमाळा दु:खाचा लोटे
सत्यचिजो आनंद कल्पना मग केवळ वाटे,
हृदयासह परि देह नाचतो या कगबालाचा
दिव्य महात्माम्हणुनि वाटतो हा मजला साचा.
वातावरणीं गूढ गीत जें अवकाशीं साचे

प्रकाशांत जे चैतन्याचे ध्वनि उठले कांहीं,
गोल डोलती अनंततेच्या ज्या मधु बोलांहीं
अधेंमुर्धें चित्र चित्रितें चपला जें कांहीं,
तेंऐकावें गीत, पहावी चित्रकला तसली, ऽ

अपूर्ण

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP