हिरवाळ गडे ही हिरवी - हिरवाळ गडे हिरवी, आकाश डौ...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


हिरवाळ गडे हिरवी, आकाश डौल वर मिरवी
रानाचि रोशना गिरवी, हिरवी राई -
चल तेथ साजणी चल जाऊं लवलाही. १

पाव्यामधिं भरलें गाणें, न्हाणील सखीला त्यानें;
अस्मान भरुन नादानें, डोलत राही -
मग शुद्ध बुद्ध उरणार कशाची नाहीं २

तार्‍यापरि सुमनें फुललीं, त्यां कृष्ण कचांवर घाली;
मग रजनी वैभवशाली, दिसशिल पाही, ३

गुलरोशन पायाखाली, डोईवर हसती हसती वेली,
वनदेवी वैभवशाली, तसल्या ठायीं
वननिर्झर झुळुं झुळुं वाहिल तुझिया पायीं ४

खांद्यावर कुरळे केश, तव प्रीतिदेवि ते पाश
गुंफीन फुलांनी त्यास -

हृदयांतिल अस्फुट गीती. नयनामधि नाचुन जाती
ओठावर बोलहि येती;

ती द्दष्टि हिर्‍याची खाण; भिवयांची काय कमान ?

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP