हे तासाचे तास - हे तासाचे तास निघुनिया जा...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
हे तासाचे तास निघुनिया जाती,
अंधार भरे मग चित्तीं,
किति दडपण हें अवजड हृदयावरतीं
कष्ठानें बोलहि निघती,
हें स्वप्नचि कीं जागृति न कळे कांहीं,
जणु गहन मनावर येई,
हीं भुतें पिशाच्चें सारीं,
वार्यावर करिती स्वारी,
मम चित्तहि त्यामाझारीं
किति आरोळ्या घोर मृत्यूला देतें
मृतवत जों हें जग होतें.
मग मद्यानें जेविं रक्त उसळावें
तशि घोर कल्पनाधावे
मग तिजवरती काळे शार विचार
गरगरगर उडती दुर
हृदयीं हें असलें चालें.
नस नस जणु करकर बोले,
सर्वांग ठेंचलें गेलें
जणूं होतिल हे खंड खंड देहाचे,
अशि धोर निराशा जाचें
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP