काव्यदेवतेस - जगन्मंगले काव्यदेवते जडात...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


जगन्मंगले काव्यदेवते जडातीत मूर्तें !
सदानंदरूपिणी स्वामिनी उदो उदो तंतें !
गीतदेवता तूंच तूंच गे शब्ददेवताही
ज्ञान - चित्कला तूंच, ईशही तुजवाचुन नाहीं.
अनंतछाया दाखवुनीया निद्रित भूगोला
अन आद्यनंतें निजभूति दिव्य त्याला
पुरोवर्तिनी दिव्य दीपिके तुजाचमागून.
दिङमूढा मानवता येई पार तमांतून
भूतकालच्या कवीधरांच्या हृदयीं अवतरुनी
प्रज्वलिली चैतन्य - ज्योति या मानवभुवनीं.
विविधरूपिणी जगन्मोहिनी सुंदरता येई
विश्वकोष नवनव्या प्रीतिचे रुचिर गंध देई.
भुलून त्याला परममंगला कमला त्यावरती
अवतरली श्रीदेविच, कविता आज तिला म्हणती.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP