मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|आत्मबोध प्रकाशिनी|

आत्मबोध टीका - श्लोक २

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


बोधोsन्यसाधनेभ्योहि साक्षान्मोक्षैकसाधनम् ।
पाकस्य वन्हिवद्ज्ञानम् विनामोक्षोनसिध्यति ॥२॥

केलि नित्यनैमित्यक कर्म । अथवा अष्टांगयोग संभ्रम । जरी केला सव इंद्रियांचा उपरम । परि बोधा वाचोनि मोक्ष नोव्हे ॥३५॥ ब्रह्मचर्यत्व नैष्टिकपण । अथवा ग्रहस्थाश्रम विधी करून । जरि वानप्रस्त सेविलें दारुम । परी बोधावाचोनि मोक्ष नोव्हे ॥३६॥ सोडोनि स्त्रिपुत्राचा संग । अंतरिं सेउनिया विराग । जरि केला सिखा - सुत्राचा त्याग । अप्रि बोधावाचोनि मोक्ष कैंचा ॥३७॥
अथवा उदंड केलें दान । किंव्हा पुत्रसंतति करून । जरि सर्व तीर्थि केलें स्नान । परि बोधावाचोनि मोक्ष कैचा ॥३८॥
अथवा यज्ञयागादि कर्मे केले । किं वापिकूप तडाग खणिले ।  जरि उदंड देवालयें बांधिले । परि बोधावाचोनि मोक्ष कैंचा ॥३९॥ येकादसि सोमवार व्रत । अथवा कृछ्र चांद्रायणादि समस्त । जरि केलीं सर्वहि पुराणोक्त । परि बोधावाचोनि मोक्ष कैंचा ॥४०॥ ऐसि परिसोनि आचार्यवाणि । सिष्य करिता जाला विनवणि । जें का सांगितलें वेदशास्त्रपुराणिं । तें काय व्यर्थ मानावें ॥४१॥
वेद सांगतसे कर्माचरण । शास्त्रें करिति आश्रम विवरण । पुराणें सांगति व्रतदान । ते काय व्यर्थ मानाविं ॥४२॥
मोक्ष नोव्हे जरि कर्में करून । तरि कां करावा वृथा सीण । कांडितां न सांपडे जरी कण । तरि कां कोंडा कांडावा ॥४३॥
ऐसें ऐकतां सिष्य वचन । सद्गुरु बोलति करुणाघन । नका घेउं तुं अडरान । ऐक वचन माझें पैं ॥४४॥
योगयागादी कर्माचरण । परंपरा मुक्तीसी कारण । जैसें जलभांड आणि इंधन । पाकालागि सामुग्रि ॥४५॥
परी अग्नि पेटल्या वीण । पाक सर्वथा नोव्होचि जाण । तैसा आत्मबोधाचिया विण । मोक्ष नोव्हेचि सर्वथा ॥४६॥
परि बोध व्हावया कारणें । केलिं पाहिजे सदाचरणें । जप - तप आणि अनुष्ठानें । वेदोदित सर्वही ॥४७॥
निष्काम कर्में ईश्वरार्पण । करितां होतसे पाप - हानन । शुद्ध होऊनि अंत:करण । वैराग्य बाणे अंतरिं ॥४८॥
मग होऊनिया मुमुक्षुवंत । सद्गुरुतें जालिया शरणागत । सद्गुरु बोधितां महावाक्यार्थ । बोध - भानु उगवे ॥४९॥
मग मोक्षाचिया वाटा । अनुभवें दिसति गा चोखटा । मूळ अज्ञानासि देशवटा । देउनिया तत्क्षणिं ॥५०॥
तूं म्हणसि कर्मिं सामर्थ्य विशेष । तेणेंचि करोनि अज्ञान नाश । बोधावाचोनिया मोक्षास । पावेन मी निश्चइं ॥५१॥
तरि कर्माचें अज्ञान कारण । तेणें नोव्हे अज्ञान हनन । येथें पाहिजे प्रकाशघन । बोध भानु सतेज ॥५२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP