आत्मबोध टीका - श्लोक ४५
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
स्थाणौ पुरुषवद्भांत्या कृता ब्रह्मणि जीविता ।
जीवस्य तात्त्विके रूपे तस्मिन्दृष्टे निवर्तते ॥४५॥
जैसा कोण्ही येक उदमाप्रति । प्राथ:काळिं उठोनि निगुति । मार्गीं स्थाणु पाहुनि चित्ति । अतिशयेसि बिहाला ॥१०॥
तो स्थाणु कृशिवळाचे क्षेत्रांत । अदौ बाभुळ वृक्ष होता निश्चित । तो कृशिवळे तोडोनि स्वहस्ते । खुंटमात्र उभा ठेविला ॥११॥ काढोनि तया वर्हील साल । खुंट दिसु लागला सोज्वळ । वर्ही तिपट खालि सरळ । ऐसा असे तो खुंट ॥१२॥
तया व्यवसायाने अकस्मात । तो स्थाणु देखिला चांदण्यांत । ह्मणे हा तस्करचि अति उन्मत्त । माते मारु पातला ॥१३॥ मध्यंतरीच माझि वाट । धरोनि उभा राहिला धीट । मग आपुण स्तब्द राहिला नीट । त्या पासोनि दूरसा ॥१४॥
ह्मणेरे ग्रहस्था न मारि माते । मी तुज घालितो दंडवताते । ऐसे बोलोनिया स्वहास्ते । वस्त्रालागी काढिले ॥१५॥
वस्त्र ठेउनि मार्गांत । माघारि निघोनिया त्वरित । ग्रामापासि येउनि रडत । हाका मारि मोठ्यानें ॥१६॥
लोकासि धावा धावा ह्मणे । मार्गिं मज लुटिले चोरानें । वस्त्रें पात्रे आणि नाणे । हिरोनि त्याणें घेतले ॥१७॥
ऐसे ऐकोनि ग्रामस्थ जन । निघाले शस्त्राप्रति घेउन । ह्मणति कोठेरे अहे कोण । तस्कर दाखवि आम्हाते ॥१८॥
उदमि तयाते दाखउन जाय । तव यामिनिहि सरति होय । जावोनि पावले तो ठाय । जेथें वस्त्रें ठेविलिं ॥१९॥
तें वस्त्रें पाहोउनिया नेत्रासि । ह्मणति तस्कर गेला कवणे देसि । उदमि दाखवि पूर्व दिसेसि । तव स्थाणु द्रिष्टिसि पाहिला ॥२०॥ मग ह्मणे नेणोन्न्रि स्थाणु साचार । म्या यातेंचि भाविले तस्कर । आणि उगाचि व्यर्थ शोकातुर । जालो हा काळ पावतो ॥२१॥ असो त्या वेव्हारियासारिखे । आत्मयाते मानिले पारुखे । तयायोगे अनेक दु:खे । सेवित होतासि हा काळ वर्हि ॥२२॥
वसवोनि अनात्मत्वाचा गाव। तेथें वस्ति करि कल्पोनि जीव । भोगित होतासि दु:ख वैभव । आत्म अज्ञाने करोनि ॥२३॥
तया आत्मयाचे वास्तवीकरण । समजता जावोनिया अज्ञान । मी जीव ऐसें जे होते भान । ते नाशाप्रति पावले ॥२४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 22, 2016
TOP