मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|आत्मबोध प्रकाशिनी|

आत्मबोध टीका - श्लोक २४

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


आत्मन: सच्चिदंशश्च बुद्धेर्वृत्तिरितिद्वयम् ।
संयोज्य चाविविवेकेन जानामीति प्रवर्तते ॥२४॥

आत्मा सच्चिदानंदस्वरूप । प्रत्यगात्मा त्याचा अंशरूप । तो बुद्धिवृत्ति करोनि समीप । बिंबता जाला त्यामाजि ॥२९०॥
तो अंश अपुल्या अंशीतें नेणून । बुद्धि आणि विषयवृत्ति सेउन । अज्ञान जें तेणें करून । प्रवर्त होय जाणिवेतें ॥९१॥
अपुण निर्धर्म निष्क्रिय असतां । बुध्यादीसंगे करोनि तत्वता । अहंकार सेवोनि जाणता । म्हणे मी या दृश्याचा ॥९२॥
शुद्ध आत्मत्विं जाणीव नसे । परी बुद्धिवृत्तेचेनि सहवासें । अज्ञानयोगें चिदंशें । अपुले अंगि लाविले ॥९३॥
म्हणे या दृश्याचा मी द्रष्टा । या ज्ञेयाचा ज्ञाता मी सुभटा । सर्व कर्मा इष्टा अनिष्टा । जाणत असे मी निश्चइं ॥२९४॥
शुद्ध असतां शबल जाला । संगें करोनि हीनत्व पावला । कित्येक खंडज्ञानि याजला । शुद्ध आत्माचि मानिताति ॥२९५॥
तया खंडज्ञानियांलागून । मुमुक्षु कोण्हि आलीया शरण । तयातें तो दाखवि खूण । चिदाभासापर्यंत पै ॥९६॥
सिष्यासि म्हणे अरे चतुरा । विमभरि करिसी जा व्यापारा । त्यातें तुं जाणसि कीं खरा । दृष्टेपणें निश्चइं ॥९७॥
स्वप्नीं जागृतीचा अध्यास । स्मरोनि पाहासी नाना विलास । तूंचि दृष्टेपणेंही तयास । जाणसि कीं निश्चित ॥९८॥
तैसीच अवस्था जे सुषुप्ति । मी सुखि निजलों ऐसि प्रतिति । हेंहि तूं जाणसि किं सुमति । आपुलीया प्रभावें ॥९९॥
तोचि तूं आत्मा अससि निश्चित । ज्ञानरूप त्रैअवस्थातीत । द्रष्टा साक्षि सदोदीत । सर्वाहूनि वेगळा ॥३००॥
मग घेवोनि वेदांतग्रंथ हाति । बोलिल्यासम वाचोनि दाखविति । उकलोनि त्वंपदाचि विप्तत्ति । सिष्यालागि सांगति ॥१॥
पुढें तत्पदाचें विवरण । तैसेंच ठेविति अछादून । मग असिपदिं ऐक्य कोण । करुं जाय तयाचें ॥२॥
मग सिष्य म्हणे गुरुराया । पुढें ग्रंथ सांगा वाचोनिया । त्यातें तो गुरु म्हणे रे सखया । भ्रम होइल तुजप्रति ॥३॥
आरे हा शब्दब्रह्मार्णव अपार । ब्रह्मादि नेणति याचा पार । अपुण स्वकार्यापुरतें सारसार । पाहूनि घ्यावें त्यांतुनि ॥४॥
तंव तो सिष्य म्हणे जि गुरुराया । मी जाणतों सर्व दृश्यासि या । परि माझें स्वरूप न पडे ठाया । मी कोण कैसा असे कीं ॥५॥
व्यापक अखंड अद्वय । अनंत अपारावार चिन्मय । हें माझ्या अनुभवासि नये । काय करुं गुरुराया ॥६॥
सर्व दृश्य आणि अवस्थात्रयातें । जाणत होतों मि पहिलाचि यातें । परी जाणत नव्हतों मी शुद्धब्रह्मातें । ह्मणोनि तुम्हातें पुसुं आलों ॥७॥
तों तुम्हिही सांगतां तेथवरि । परि शुद्ध आत्मा राहिला दुरि । ऐसें मज वाटतसे निर्धारिं । गुरुराया दयाळा ॥८॥
दृश्य हें काय खरें आहे । तरी मग तयाचा दृष्टा खरा होय । इतुक्याच विचारें करून स्यो । न सापडे त्या अविनाशाचि ॥९॥
ऐसें ऐकोनि तयाचें उत्तर । गुरु उगाचि बैसला चिंतातुर । मग सिष्यानें करोनि नमस्कार। गेला अन्नेत्र स्थळासी ॥१०॥
ऐसि हे गुरु सिष्याचि कथा । तूंतें सांगितलि गा तत्वता । तरि तुं सावध होवोनि आतां । अनुभव शोधोनि घेइ पा ॥११॥ सत्सिष्य म्हणे श्रीगुरुराया । तो साधक कां गेला उठोनिया । विश्वास ठेवोनि वचनीं त्याचिया । कां हो नाहिं राहिला ॥१२॥
मग अचार्य म्हणति रे सुमीत । तूंतें सांगतों देवोनि उपपत्ति । कोण्हि येक तक्र घेवोनि हातिं । उचलोनि प्याला ढसढसा ॥१३॥ विश्वास ठेवोनि त्याचियावर्‍हि । म्हणे हें अमृतचि असे निर्धारि । परी तया अमृताचि बरोबरी । काय करील कांजि ते ॥१४॥
मूर्ख अमृत म्हणोनि तक्र प्याला । परंतु परिणामिं मृत्यु पावला । विश्वास ठेविला तो वाया गेला । तैसाचि हाहि जाण पा ॥१५॥ तरि शुद्ध आत्मा अनुभवावा । मग विश्वास ही तेथें ठेवावा । त्याचा निजध्यास करितां बरवा । कृतकार्यता होतसे ॥१६॥
तूं म्हणसि तें तक्र विजातीय । म्हणोनि तेणें नोव्हे अमृताचें कार्य । परि हा विचार सजातीय । व्यतिरेकपरत्वें असे पैं ॥१७॥ तरी हा व्यतिरेक खरा असे । परी इतुक्यानेंचि अनुभव होत नसे । जेव्हां चवथि अवस्था प्रकाशे । तेव्हां साक्षात्कार होय पैं ॥१८॥
नाहीं तरि ह्या ऐलिकडिलचि गोष्टि । अवधि माया अविद्योचि श्रिष्टि । विश्व तैजस प्राज्ञ हे त्रिपुटि । जीवचि होय येकला ॥१९॥
तो जीव जागृतिमाजि विश्व होउन । जाणे जाग्रद अवस्थे लागुन । तैसाचि स्वप्नामाजि तैजसपण । सेवोनि जाणे स्वप्नातें ॥२०॥ सुषुप्ति अवस्था गाढ अज्ञान । तेव्हां तो जीव पावे प्राज्ञपण । अपुल्या स्वरूपिं मिळून । कांहिं न जाणे अज्ञानें ॥२१॥
न जाणे बाहिरील दृश्यातें । न जाणे अतील मनोवृत्तीतें । तेव्हां न जाणे अपणातें । कोण कैसा असे मी ॥२२॥
मागति जागृद अवस्थेंत येतां । सांगे तेथील सुखाचि वार्ता । ऐसि तिन्ही अवस्थेंत होय गता याता । परि चवथि अवस्था न देखेचि ॥२३॥
जेव्हां ज्ञानद्रिष्टिनें आत्मा पाहिल । तेव्हां तुर्यावस्थेंत तुरीय होइल । मग समूळ अज्ञान जाइल । आत्मस्वरूप विषइचें ॥२४॥ असो ऐसें खंडज्ञान । पृथ्विवरि बोलति बहुतजन । परि तूं हेचि वोळखि खूण । किं जाणीव तितुकि जीवाचि ॥२५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP