आत्मबोध टीका - श्लोक ३४ व ३५
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
अहमाकाशवत्सर्व बहिरंतर्गतोच्युत: ।
सदासर्वसम:शुद्धो नि:संगोनिर्मलोचल: ॥३४॥
मी आकाशा सारिखा निर्मळ । व्यापोनिया दृश्यजात सकळ बहिरंतरगत असता सर्वकाळ । निसंग असे सर्वदा ॥२३॥
शमविषमा माजि मी सम । च्युती रहित मी अच्युत नि:सीम । शुद्ध स्वरूप उत्तमोत्तम । चळरहित अचळ मी ॥२४॥
नित्यशुद्धविमुक्तैकमखंडानंदमद्वंय ।
सत्यंज्ञानमनंतं यत्परंब्रह्माहमेवतत् ॥३५॥
मी नित्यशुद्ध विशेषण मुक्त । अखंड आद्वय आनंद भरित । सत्य ज्ञानानंत जें निश्चित । तेंचि ब्रह्म असे मी ॥२५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 21, 2016
TOP