मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|आत्मबोध प्रकाशिनी|

आत्मबोध टीका - श्लोक ११ व १२

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


पंचीकृत महाभूतसंभवं कर्मसंचितं ।
शरीरं सुखदु:खानां भोगायतनमुच्यते ॥११॥

टीका - पंचमहाभूतें द्विधा केलें । अर्ध भागातें चतुर्धा विभागिलें । मागति स्वांश मेळवोनि वहिले । कर्दम केला भूतांचा ॥५४॥
जे ईश्वराचे देहत्रय । तें जीव देहाचें कारण होय । हा सेवटपर्यंत अन्वय । ऐश्यापरि जाण तुं ॥५५॥
या परि करोनि पंचीकरण । संचित कर्मयोगें करुन । सुखदु:ख भोगावया लागुन । स्थूल - देह सदन निर्मिलें ॥५६॥
अस्ति - मांस - नाडी आदिकरुन । सप्तवितिस्थ लंबायमान । हास्तपादादि अवयेव संपुर्ण । जया लागि आसति ॥५७॥
हा पंचीकृत स्थूळ देहे । तूतें सांगितला नि:संदेहे । आतां सूक्ष्म अपंचीकृत देह । तोहि सांगतों ऐक पां ॥५८॥

पचप्राणमनोबुद्धिदशेंद्रियसमन्वितम् ।
अपंचीकृतभूतोत्थं सूक्ष्मांगं भोगसाधनं ॥१२॥

हिरण्यगर्भाचे अंशभाग । तयाचा लिंगदेह केला सुभग । नोहे पंचकारणातिल अंग । म्हणोनि अपंचिकृत म्हणिजे पैं ॥५९॥ पंचप्राण आणि मन । बुद्धि दशइंद्रिय मिळून । ऐसे हे सप्तदश येकवटोन । लिंगदेह जाहाला ॥६०॥
आतां त्या लिंगदेहाचा प्रकार । तुतें सांगतो सविस्तर तो ऐकोनि घेयीं अति अदरें । येकाग्रचित्तें करोनि ॥६१॥
प्राण अपान व्यानोदान । पांचवा जाण पां समान । अणखि पंचउपप्राण । तेहि सांगतों ऐक पां ॥६२॥
नाग कुर्म कृकल हे तीन । देवदत्त धनंजय हे दोन । ऐसे हे पंचविध उपप्राण । वेगळेपणें असति ॥६३॥
आतां दश इंद्रियें कोणतिं । तेहि तुज सांगतों यथानिगुति । ऐकोनि घेइ पा सुमति । विस्तार त्याचा सर्वही ॥६४॥
श्रोत्र त्वचा आणि चक्षु । जिव्हा घाणेंद्रिय प्रत्यक्षु । जे पंचविषय घ्यावया दक्षु । ते हे पंचज्ञानेंद्रिय ॥६५॥
आतां कर्मेंद्रियपंचक । तुतें सांगतों बरें ऐक । वाचा हास्त पाद गुद चतुर्थक । सिस्न हें जाण पांचवें ॥६६॥
संकल्प विकल्पात्मक मन । निश्चयात्मिका बुद्धि जाण । ऐसे हे सप्तदश मिळोन । लिंग देह जाण पा ॥६७॥
हें सत्राही जणें मिळून । सुखदु:खभोगाचिं साधनें । पंच विषयाप्रति सेउन । जीवा लागिं भोगविति ॥६८॥
आतां सांगतों तिसरा देहे । जो या द्वय देहाचा कारण होय । सर्वापरि आज्ञानमय । सांगतों तो ऐक पा ॥६९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP