मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|आत्मबोध प्रकाशिनी|

आत्मबोध टीका - श्लोक ५३

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


उपाधिविलये विष्णौ निर्विशेषं विशेन्मुनि: ।
जलेजलं वियद्व्योम्नि तेजस्तेजसि वायथा ॥५३॥

टी० :- सुखदु:खात्मक प्रारब्ध सरता । देहद्वय उपाधि विलया जाता । मग अप्यापक विष्णुचि निर्विशेषता । तदैक्य होय तो मुनि ॥९६॥
निर्विशेष ह्मणजे निर्विकार । मायातीत जो चित्सार । तदैक्यता पावे तो मुनिवर निर्विशेषत्वे करोनि ॥९७॥
जैसा जळावर्‍हि आला बुद्बुद । त्यातील जळ अधि होते अभेद । मग तया बुद्बुदाचा होता भेद । विशेष ऐक्यता होतसे ॥९८॥
कि गगनि उठले अभ्रपडळ । तदवछिन्न जाले जे अंतराळ । विलयासि जाता ते अभाळ । मग विशेष ऐक्यता नभाचि ॥९९॥ सुर्यरस्मिवर्‍हि मृगजळ पाहि । त्या मृगजळावछिन्न रस्मि जा काहि । ते मृगजळ निशेष जालिया नाहिं । विशेष ऐक्यता रस्मिची ॥७००॥
तैसा अखंड आत्मा अद्वय । तेथे अज्ञानकल्पीत देहद्वय । त्याचा प्रारब्धक्षइं होता लय । जीवात्मा निर्विशेष होय पै ॥७०१॥ यर्‍हविxयाचे देहद्वय पडावे । आणि मग तयाचे ऐक्य व्हावे । हे काहीच नलगे ह्मणावे । पहिलेचि ऐक्य असे त्याचे ॥२॥
परि प्रारब्ध सरण्याचि होति अवधि । त्यास्तव राहिलि होति देहद्वयउपाधि । तेहि लया जाता निरवधि । ऐक्य विशेषतर होत पै ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP