मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|आत्मबोध प्रकाशिनी|

आत्मबोध टीका - श्लोक ५

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.

अज्ञानकलुषं जीवं ज्ञानाभ्यासाद्विनिर्मलं ।
कृत्वा ज्ञानं स्वयं नश्येज्जलं कतकरेणुवत् ॥५॥

रजोरूपें जें कां अज्ञान । जीव मळीन जाला तेणें गुण । तो तत्वज्ञान जें तेणेंकरून । विशेष निर्मळ होतसे ॥६९॥
तया अज्ञानाचि कार्य । अंत:करण । देह इंद्रिय । याचा अध्यास घेतला स्वयें । जीवें अपुल्या मस्तकिं ॥७०॥
ह्मणे मी कर्ता आणि भोक्ता । सुखदु:खें सर्वहि तत्वता । जन्ममरणादेक वार्ता । मजला असे सर्वहि ॥७१॥
आपण शुद्ध चैतन्य असतां । देहाचें जडत्व घेवोनि माथा । त्याचिया योगें व्याकुळता । पाबे जीव आपण ॥७२॥
घेवोनि अज्ञानाचि बुंथी । बैसलीसे चिज्जड - ग्रंथि । तेथें स्वरूपज्ञानाचि युक्ति । करितां उकले नि:शेष ॥७३॥
तूं जरि ह्मणसील ऐसें । कीं ज्ञानेंकरून अज्ञान नासे । परि त्या ज्ञानासही कारण असे । अंत:करणवृत्ति पै ॥७४॥
त्या वृत्तिचें अज्ञान कारण । तें स्वरूपिं संभवेल कवणे गुणें । ऐसें जरि चिंतील तुझें मन । तरी तें वचन ऐक पां ॥७५॥
जैसें डहूळिलिया उदकाप्रति । चतूर निवळीचें बीज घालिति । गाळ निवारितां तेही बैसति । कतकरेणु तळवटिं ॥७६॥
तैसा अज्ञानजनित जो संसार । तो ज्ञानवृत्तिनें होवोनि परिहार । सेखिं ज्ञानवृत्ति होउनि स्वरूपाकार । शुद्ध आत्मा उरतसे ॥७७॥ सिष्य ह्मणे वो कृपामोर्ति । अशंका उदेलि माझिये चित्तिं । संसाराचि प्रत्यक्ष प्रतीति । आसतां कैसा निवारे ॥७८॥
चार वाणि चार खाणि । चौर्‍यांसि लक्ष जीवयोनि । पिंडब्रह्मांडउभारणि । ज्ञानें कैसिं नासति ॥७९॥
देवयक्षचारणगंधर्व । अप्सरगुव्हक नागकूळ सर्व । नाना तीर्थें क्षेत्रें अपूर्व । ज्ञानें कैसिं नाशति ॥८०॥
ऐसें ऐकूनि सिष्यवचन । सद्गुरु ह्मणति रे दे अवधान । तुझिया शंकेचें उत्थान । दृष्टांतयोगें वारितों ॥८१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP