मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|आत्मबोध प्रकाशिनी|

आत्मबोध टीका - श्लोक ६८

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


दिग्देशकालाद्यनपेक्ष्यसर्वग्म शीतादिहृन्नित्यसुखं निरंजनं ।
य: स्वात्मतीर्थं भजते विनिष्क्रिय: स सर्ववित् सर्वगतोमृतोभवेत् ॥६८॥

टीप :- दिग्देश कालादि अपेक्षा रहित । पातकादि - द्वंद्वहारक सुख भरित ।
ऐसा आत्मा नित्य निरंजन सर्वगत । हेचि तिर्थ सेविले जेणें ॥१७॥
तो सर्ववेत्ता आणि सर्वगत । तो अमर जन्म मरणा रहित । तू ऐसे जाण पा निश्चित । विनिष्क्रिय पुरुष तो ॥१८॥
जाते काहीयेक कर्तृत्व नसे । त्याते म्हणावे विनिष्क्रिय ऐसें । तो ब्रह्मवेत्ता ब्रह्मि वसे । ब्रह्मरूपचि होउनि ॥१९॥

संमत श्लो० - स्नातं तेन समस्त तीर्थ - सलिले दत्तापि सर्वावनि: । सर्वास्तेन कृता मखाश्च निखिला देवाश्च संपूजिता: । संसाराच्च समुद्धृताश्च पितरस्त्रैलोक्य - पुज्योप्यसौ । यस्य ब्रह्म - विचारणे क्षणमपि स्थैर्यं मन: प्राप्नुयात् ॥१॥

तेणे सर्व तीर्थिं स्नान केले । सर्व पृथ्विचे दान दिधले । समस्त यज्ञ यागाप्रति केले । देव पूजिले सर्वहि ॥८२०॥
संसार - दु:खा पासोनि पितर । उद्धरिले समस्त सपरिवार । तो पुज्य जाला त्रैलोक्यभर । जाचे मन क्षणभर स्थिर विचारि ॥२१॥ येक क्षण विचाराचा यव्हडा महिमा । मग ब्रह्मचि जाला त्याचि कोण करि सिमा । तया योगींद्रवर्याचि प्रतिमा । नसेचि कोण्हि त्रैलोकि ॥२२॥
ऐसे ऐकोनि अचार्य वचन । सत्सिष्य करि शतावधि नमन । म्हणे स्वामि मी जालो धन्य धन्य । तूमचा चरण प्रसादे ॥२३॥ आता गुरुदक्षणा द्यावयासि । काहीच नसे मजविण मजपासि । म्या जरि द्यावे आपणासि । तरि स्वामिसी मजसि भेद नसे ॥२४॥
यास्तव उगेचि राहाता भले । म्हणोनि धरिले दृढ पाउले । चिरकाळवर्‍हि मस्तक ठेविले । चरणकमळिं गुरुचा ॥२५॥ मी कृतार्थ कृतार्थ ऐसे वदुन । वारुंवार करि साष्टांग नमन । तैसाचि श्रीगुरुचरणिं निरंजन । वंदन करि सद्भावें ॥२६॥
जि जि सद्गुरुस्वामि रघुराया । गोदातीर - जनस्थान - विलासिया । साष्टांग प्रणाम तुमचा पाया । असोत माझे बहुकाळवर्‍हि ॥२७॥ स्वामिनि अज्ञा केलि होति । जे आत्मबोधावरि टीका करि निगुति । तें म्या तुमचे चरण - प्रसादे यथामति । वर्णन केलि श्रीगुरु ॥२८॥
या ग्रंथावरि टीका करावयासि । काहीच शक्ति नव्हति मजसि । परि श्रीगुरुच वसोनि जिव्हाग्रासि । वर्णविलि ही टीका ॥२९॥ आताम वंदु श्री शंकराचार्य । जे समस्त विश्वजनाचे आचार्य । जे ब्रह्मविद्या प्रकाशक सुर्य । कलयुगामाजि प्रगटले ॥३०॥
जे प्रत्यक्ष ईश्वरि अवतार । अनेक मताचा करोनि परिहार । जांनिं केला आत्मनिर्धार । इये ग्रंथि ॥३१॥
ऐसिया सुरस ग्रंथावरुति । टीका केलि म्या पामरजाति । जैसें चिंधुकात रत्नाप्रति । ग्रंथन केलें मूर्खत्वें ॥३२॥
काहि न कळतां ग्रंथाचा अर्थ । उगीच वाचाळता केलि व्यर्थ । परि तुह्मि दयालु परम समर्थ । क्षमा कराल मजवर्‍हि ॥३३॥
वडुथ ग्रामि कृष्णा तिरि । शके सत्रासे अडतीस घात्र संवत्सरि । श्रावण वद्य येकादसि इंदुवारि । टीका सिद्धिसि नेलि पै ॥३४॥ इति श्री आत्मबोध - प्रकाशनि । निरंजनाची साबडि वाणि । श्रीशंकराचार्य रघुविरगुरुचरणि । आर्पण असो सद्भावें ॥३५॥ इतिश्रीपरमहंस परिव्राजकाचार्य गोविंदभगवत्पूज्यपादसिष्य श्रीमच्छंकराचार्य - विरचितात्मबोध प्रकरणं सटीकं संपूर्णमस्तु ॥ दत्त ॥ श्रीगुरु दत्तात्रयार्पनमस्तु ॥ रघुनाथगुरुवे नम: ॥
॥ श्रीदिगंबरार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP