आत्मबोध टीका - श्लोक ६४
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
दृश्यते श्रूयतेयद्यद् ब्रह्मणोन्यन्नकिंचन ।
तत्वज्ञानाच्चतद्ब्रह्म सच्चिदानंदमद्वयं ॥६४॥
ऐकणे पाहाणें जे जे कांहि । ते ते ब्रह्मावाचोनि सर्वथा नाहि । परि तत्वज्ञान जालिया पाहि । अद्वय ब्रह्म सच्चिदानंद ॥८९॥
नाहि तरि अज्ञानिया नरासि । दृश्यचि दिसे सर्वहि देसि । जैसे धन अभाग्गियासि । दिसे विंचुसर्पत्वें ॥९०॥
न होता सत्यत्वें रज्जुज्ञान । सर्पबाधा होतसे दारुन । तैसे सर्व ब्रह्मचि परि अज्ञाना लागुन । होत असे बाधक पै ॥९१॥
जैसि कोण्हि येकाचि स्त्री प्रचंड । तीते दुसरा ह्मणु गेला रांड । ती म्हणे मी अपल्या नवर्याचि रांड । परि तुझा धगडचि असे मेल्या ॥९२॥
तैसि माया मिथ्या खरि । परि इतें जो ब्रह्मरुपत्वें वरि । तयाचीच हे अर्धांग नोवरि । वर्ते अभेदरुपत्वें ॥९३॥
नाहिं तरि अज्ञानिया नरा । करोनि देह - द्वयाचा पिंजरा । देतसे जन्ममरणाचा घेरा । लिलामात्रे अपुल्या ॥९४॥
तीते न वरितां ब्रह्मत्वें करुन । उगेचि जरि ह्मटले मिथ्या ह्मणुन । तरि कां चुकति जन्ममरण । तत्वज्ञानावाचोनि ॥९५॥
सर्व ब्रह्म दिसावया लागुन । येक तत्वज्ञानचि होय कारण । जैसें स्थळोस्थळिं दिसावया धन । अंजन पाहिजे नेत्रासि ॥९६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 22, 2016
TOP