आत्मबोध टीका - श्लोक ४
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
परिच्छिन्न इवाज्ञात्तन्नाशे सति केवल: ।
स्वयं प्रकाशते ह्यात्मा मेघापायेंशुमानिव ॥४॥
परिपूर्ण आत्मा आनंदघन । अद्वितीय अखंड दंडायमान । तयातें अज्ञानवसें करून । परिच्छिन्न ऐसें भाविसि ॥६३॥
जैसें आकाशामाजिल चंद्रबिंब । तें पाहुं जातां घटावलंबें । येकचि असतां स्वयंभ । नानावीध दीसति ॥६४॥
चंद्र मोठेपणें लक्ष गांवें ॥ तो लाहानसा दिसे घटासवें ॥ नेणतां मुख्य बिंबासि बरवें । परिच्छिन्न दिसे भ्रमद्रिष्टि ॥६५॥
कां जैसें येकचि असतां आकाश । तें उपाधि - योगें दिसे बहुवस । घटावच्छिन्न मठावच्छिन्न आकाश । पाहाणें जैसें अज्ञानें ॥६६॥
तैसा आत्मा अपरिच्छिन्न आसतां । अज्ञानें परिच्छिन्नवत् भासे तत्वता । त्या अज्ञानाचि जालिया निरासता । आत्मा स्वयें प्रकाशे ॥६७॥
जैसा अभ्राचा नाश होतां । भानु स्वयें प्रकटे तत्वता । मग तयातें आणि प्रकाशविता । नलगे कोण्हि दुसरा ॥६८॥
N/A
References : N/A
Last Updated : November 21, 2016
TOP