ब्रम्हस्तुति - चरण २ - भाग २
कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.
जो कां वत्सप - वत्सरुप हरि हा तद्वस्त्र तद्भूपणें
शिकीं वेत्र विषाण वेणु अवघीं झाला स्वयें आपणें
रुपे सर्वहि तीं चतुर्भुज घनः श्यामेंचि म्या देखिलीं
ब्रम्हांडें सचतुर्मुखें तितकियापाशीं उभीं राहिलीं ॥३१॥
अंडें किती विधि किती मज लेखवेना
तेव्हां अतर्क्य महिमा मज देखवेना
आछादिलें विभव हें हरिनेंचि जेव्हां
आली मला स्मृति हळूहळू आजि तेव्हां ॥३२॥
म्हणुनि अंड - शरीरहि मी जरी
तरि हि मेरुपुढें जसि मोहरी
मनिं विचारुनियां विधि येरिती
वदतसे स्वलधुत्त्व हरी प्रती ॥३३॥
अंडें जेविं विशाळ येचरितिनें ब्रम्हांड हें निर्मिलें
आकाशादिक पंचकें महदहंकारें तमें वेष्टिलें
माझा यद्यपि देह हा तरि असंख्यातें नजाणों किती
एकैका तव - रोम - कूप - विवरीं अंडें असीं श्रीपती ॥३४॥
गृहीं छिद्रद्वारा दिसति किरणाचे त्र्यणुकतें
तयांचीही संख्या करिन म्हणतां ते नघडनें
अशां रेणूचे ते द्वयणुक त्र्यणु जे त्यांस गणना
नसे तैसी रोमाप्रति हरि तुझ्या अंडरचना ॥३५॥
किडे उंबराच्या फळामाजि पोटीं
असे अंड कोटी मध्यें जीव कोटी
किडे नेपाती आणिकां उंबरांसी
असे जीव हे नेणती अंडरासी ॥३६॥
अनेकें जसीं उंबरें एक वृक्षीं
तसा अंड कोटींस तूं एक साक्षी
फळांच्या त्रिकाळीं तरु तोचि जैसा
अति त्यांस अंडांस तूं नित्य तैसा ॥३७॥
माझें शरीर तंव एकचि अंड देवा
अंडें अनंत तुजभीतरि वासुदेवा
तोमी किती किती तुझा महिमा मुकुंदा
भावें अशा विनवि कृष्ण - पदाऽरविंदा ॥३८॥
जगें जेधवां येरिती कोटि कोटी
मुकुंदा तुझ्या एकल्याच्याच पोटीं
तयीं हे जरी अस्मद न्याय झाले
न तूं कोपसी येरिती येथ बोले ॥३९॥
गर्भान अर्भक जरी जननीस लाला
हाणे तयास हरि काय करील माता
हें विश्व आणि कमळासन अंडकोटी
यांतील काय मज सांग तुझ्या न पोटीं ॥४०॥
जैसें समस्त उदरांत तुझ्या अनंता
तैताच मी म्हणुनि बोलियला विधाता
आतां वदेल जननी जनक त्रिलोकीं
लोकां अनेक मज दोतिहि एक तूं कीं ॥४१॥
नाभींस पंकज तुझ्या मज जन्म तेथें
तूं माय बाप मज आणिक कोण येथें
हे अन्यथा जरि म्हणो तरि वेदवाणी
बोले असें अनृत केविं स्थांगपाणी ॥४२॥
त्रिलोकाच्या नाशीं सकळ जळराशीस मिळणें
तयांमध्ये योगें करुनि उदकी तूज निजणें
सरे निद्रा द्रष्टा मकटसि जळें तेंचि दिसती
विना द्रष्टा दोरीं अघटित मृषा सर्पवसतीं ॥४३॥
नजाणे जो दोरा भुजगचि खरा त्यास दिसतो
जरी दोरा जाणे नयनिं लटिका सर्प बसतो
तसा तूं ज्या नीरीं निजसि दिसतें तेंचि उठतां
नसे कोणी द्रष्ठा तरि मग नये सर्प म्हणतां ॥४४॥
लयाच्या ही अंतीं किमपि सदसद्विश्व नदिसे
तंई कोठें पाणी अति गहन गंभीरहि असे
अशा ऋग्वेदाच्या श्रुति वदति यालागिंच लयीं
निजे द्रष्टा पाणी किमपिहि न निर्वाण समयीं ॥४५॥
निजे पाण्यामध्यें गिळुनि निजतो त्याच सलिलीं
उटे ऐसें वेदीं मुनिवर - कुळें हेंचि वदलीं
निजे द्रष्टा दोरीं भुजग अवलोकूनिच जसा
उठे तेव्हां मिथ्या भुजगचि यथा पूर्वचि तसा ॥४६॥
या कारणें त्रिभुवन - प्रळयांस नीरीं
निद्रा करी उदकिं त्याच उठे मुरारी
द्वैपायनादि मुनि बोलति हें पुराणीं
तो रज्जुसर्प निजतां उठतांचि पाणीं ॥४७॥
या कारणें त्रिभुवन - प्रळयांतकाळीं
जें नीर त्यांत हरि - नाभि - सरोज - नाळीं
झाला विरंचि म्हणती निगमीं पुराणीं
भावे अशाच वदतो विधि ही स्ववाणी ॥४८॥
कीं बोलती श्रुति जगत्रय - अंतकाळीं
नारायणो दर सरोरुह - नाभिनाळीं
झाला चतुर्मुख न हे तरि गोष्टि खोटी
तूं सांग कीं उपजलों न तुझ्याच पोटीं ॥४९॥
भावार्थ हा किं तुझि याच पोटीं
मीं जन्मलो गोष्टि कदां न खोटी
तूं माय बी बाळ तुझाचि जेव्हां
मानू नको हा अपराध तेव्हां ॥५०॥
या कारणें जनतिच्या उदरांत लाता
झाडी शिशू न मनिं ते अपराध माता
हे पूर्व - पद्म - रचना दृढ येथ केली
ते ब्रम्ह - वैखरि असोरिती वर्णियेली ॥५१॥
तुझा पुत्र मी स्थापिलें हें तथापी
मनीं शंकला येरिती गोपरुपीं
मला काय तूं पुत्र नारायणाचा
झणी मोह ऐसा करी कृष्णवाचा ॥५२॥
म्हणोनि बोलेल विरंचि आतां
कीं तोचि नारायण तूं अनंता
नारायणाचे बहु अर्थ जेथें
तो श्लोक वर्णील हरीच येथें ॥५३॥
नव्हेसि नारायण केविं देवा
आत्माचि तूं केवळ वासुदेवा
तूं बिंब नाना - प्रतिबिंब - वृंदा
उपाधिभेदें रचिसी मुकुंदा ॥५४॥
अनेकां घटीं एक आकाश जैसा
हरी एक सर्वा शरीरांत तैसा
नभें दूसरीं त्याच कुंभांत नीरीं
जसीं येरीति जीव नाना शरीरीं ॥५५॥
तूं बिंब सर्वात्मक वासुदेवा
हे जीव तूझे प्रतिबिंब देवा
उपाधि - योगास्तव भिन्न होती
भोगूनि कर्मे तुज माजि येती ॥५६॥
एवं सुषुप्ति - समयीं प्रळयीं जयांला
बिंबैक्य भिन्नपण लेश नसे तयांला
जीवां असा सतत आश्रय तूंचि जेव्हां
नारायणाख्य सकळात्मक तूंचि तेव्हां ॥५७॥
जे जीव तेचि नर संस्कृत वेदवाचे
तैसेंचि नार म्हणिजे समुदाय त्यांचे
नारांस त्यां अयन आश्रय बिंबरुपें
नारायणाख्य सकळात्मक चित्स्वरुपें ॥५८॥
व्योय - साम्य वदती श्रुति बिंब विष्णु आश्रय असा प्रतिबिंब
जीव जैं प्रतिघटीं प्रतिरुपीं बिंब ईश्वर तदैक्य तथापी ॥५९॥
नारायणा वांचुनि ईश कैंचा
जो जीवदाता सकळां जनांचा
प्रकाशितो जो जड सर्व तारें
आणीक नारायण या प्रकारें ॥६०॥
N/A
References : N/A
Last Updated : July 03, 2009
TOP