|
वि. एक हजार . [ सं . ] ०कर पु. सूर्य . ०किरण न. सूर्य . ०घृत न. हजार वेळां धुतलेलें औषधोपयोगी तूप . ०दल न. १ कमल . २ ब्रह्मरंध्र ; ब्रह्मदल . सहस्त्र दलाचा मेघु । पीयूषें वर्षोनि चांगु । - ज्ञा १८ . १०३९ . ०धा क्रिवि . हजार तर्हानीं , प्रकारांनीं . ०नयन न. इंद्र . ०नाम न. १ हजार नांवांचा संग्रह , यादी ( विष्णु , शिव वगैरे देवतेस तुलसी , बेल , दूर्वा वगैरे वरीलपैकीं एकएक नांव घेऊन हजार नांवागणिक वाहण्याचा प्रकार . ३ ( ल ) अपशब्द ; शिव्या . तुम्हांस सहस्त्रनामें वाहतात . - ख २७११ . ०फडी वि. १ हजार फडया असलेला ( नाग , शेष ). २ फडया निवडुंग . ०फळ न. एक दोडक्यासारखें भाजीचें फळ व वेल . ०भोजन न. एक हजार ब्राह्मणास अन्नदान देणें , जेवण घालणें . ०मुख पु. शेष . न वर्णवती सहस्त्रमुखा । ब्रह्मादिका अलक्ष्य । - एरुस्व १ . २२ . ०रश्मि पु. सूर्य . ०शः क्रिवि . हजारांनीं ; हजारों . सहस्त्रावधि क्रिवि . हजारांनीं ; हजारों . ०शीर्ष वि. हजार डोकीं असलेला ( विराट पुरुष ); हजार मस्तकांचा . फंणांचा ( शेष ) जी सहस्त्रशीर्ष याचे दाखले कोडी . वरी होताति एकि वेळे । - ज्ञा ११ . २६९ सहस्त्राक्ष - वि . १ हजार डोळयांचा . २ सर्व पाहणारा ( विराट्पुरुष ). - पु . इंद्र .
|