Dictionaries | References

घागर

   
Script: Devanagari

घागर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
, to hold water. घागरीं फुंकणें To blow and sound in a pitcher or pot. A diversion of women on the eighth of आश्विनवद्य &c.

घागर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A vessel (of copper, brass, or earth).
घागरी फुंकणें   To blow and sound in a pitcher or pot.

घागर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  घड्यापेक्षा मोठ्या आकाराचे पाणी ठेवण्याचे भांडे   Ex. तिथे घागरीत पिण्याचे पाणी भरून ठेवले आहे
MERO STUFF OBJECT:
धातू
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benগাগর
gujગાગર
hinगगरा
kanಕೊಡ
oriଗରା
sanबृहत्घटः
telబిందె
urdگگرا
noun  पाणी भरण्याचे मातीचे भांडे   Ex. त्याने घागरीत पाणी आणले.
MERO STUFF OBJECT:
माती
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benকলসী
gujગાગર
hinगगरी
kanಸಣ್ಣಕೊಡ
kasنوٚٹ
kokकोळसुली
oriକଳସୀ
sanकलशिः
tamமண்குடம்
telకడవ
urdگگری , گگریا , گاگر
See : घडा

घागर     

 स्त्री. ( तांबें , पितळ , माती इ० काचें ) पाणी ठेवण्याचें आंवळ गळयाचें भांडें ; घडया पेक्षां मोठया आकाराचें पाणी ठेवण्याचें भांडें ; मोठी कळशी ; घट . अमूप अमृत फल क्षीर घागरी । दध्योदनेसीं वायन करी । - भारा , वाल १२ . २३ . घागरीची तहान पण घोटानेंच भागवायाला हवी . - जन्मरहस्य २४ . १ ( दारूकाम ) एक दारूचें झाड ; खापराची घागर घेऊन तिच्या बुडाला जाळीदार भोंकें पाडून त्या प्रत्येक भोंकाच्या तोंडाशीं बाण ठेवतात . तोंडावर भुईनळा ठेवून नळा दाखवितात . वर झाड उडतें व सभोंवार तारे व बाण उडतात . [ सं . गर्गरी ; प्रा . गग्गरी ; घग्घर ; सिं . घाघरि ] ( वाप्र . ) घागर उदवणें महालक्ष्मीच्या दिवशीं रात्रीं बायका शेगडीवर ऊद घालून वर घागर धरतात ती क्रिया - बदलापूर २१५ . - री फुंकणें - आश्विन शुध्द अष्टमीच्या रात्रीं महालक्ष्मीची स्थापना करून तिची पूजा करून तिच्यापुढें स्त्रिया घागरींत तोंडाचा फुंकर घालून घुमतात ती क्रिया . पालथ्या घागरीवर पाणी - ( पालथ्या घागरीवर पाणी ओतल्यास तें तिच्या आंत न जातां वाहून जातें यावरून ) निरुपयोगी , निरर्थक उपदेश . जेथें उपदेश ठसत नाहीं तेथे प्रयोग . सामाशब्द -
०गडचासुभा  पु. पाणी भरण्याची नोकरी ; पाणक्याचें काम .
०गडची  स्त्री. पाणक्याची नोकरी . घागराळें - न . प्रवासांत खोगिराला घागर अडकविण्याकरितां काठयांची व दोर्‍यांची केलेली विशिष्ट रचना , चौकट . [ घागर + आळा ] घागर्‍याआंबा - पु . आंब्याची एक मोठी जात ; घागरी एवढा आंबा . [ घागरी + आंबा ]
सुभेदारी  स्त्री. पाणक्याची नोकरी . घागराळें - न . प्रवासांत खोगिराला घागर अडकविण्याकरितां काठयांची व दोर्‍यांची केलेली विशिष्ट रचना , चौकट . [ घागर + आळा ] घागर्‍याआंबा - पु . आंब्याची एक मोठी जात ; घागरी एवढा आंबा . [ घागरी + आंबा ]

घागर     

घागरगडचा सुभा
घागरगडची सुभेदारी
(उप.) पाणक्‍याचे काम.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP